Every question from the Marathi Literature Optional papers of UPSC Mains 2023, placed in its syllabus unit and checked against all questions asked from 2013 to 2022. See what was familiar, what came back and what was new.
Other years:
What stood out in 2023
- More marks than usual: साहित्यसमीक्षा (70 marks, against an average of 44).
- Fewer marks than usual: मराठी साहित्याचा इतिहास (130 marks, against an average of 158).
- 2 questions were close repeats of an earlier paper: Q1a (Paper II), first seen in 2019; Q3b (Paper I), first seen in 2020.
- Every question came from a topic UPSC had asked recently.
Which units got the marks in 2023
Marks asked from each unit in 2023 (dark bar) against its average for 2013–2022 (grey bar).
Paper I
| Unit | 2023 | Average 2013–22 |
|---|---|---|
| भाषा आणि लोकसाहित्य | 200 | 196 |
| मराठी साहित्याचा इतिहास | 130 | 158 |
| साहित्यसमीक्षा | 70 | 44 |
Paper II
| Unit | 2023 | Average 2013–22 |
|---|---|---|
| विभाग अ: गद्य | 200 | 200 |
| विभाग ब: कविता | 200 | 200 |
A question that fits two units is split equally between them.
Paper I
Q1a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: “भाषा एक संकेतप्रणाली आहे,” सोदाहरण स्पष्ट करा. (10 marks)
Q1b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: बोलींची विविधता सांगून डांगी बोलीची वैशिष्ट्ये लिहा. (10 marks)
Q1c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठीत किती विभक्ती मानाव्यात, ह्यासंबंधीच्या चर्चेचे साधार विवेचन करा. (10 marks)
Q1d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लोकगीतातील संस्कारगीतांचे स्वरूप स्पष्ट करा. (10 marks)
Q1e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: भाषिक भांडार व लघुक्षेत्र ह्या संकल्पना स्पष्ट करा. (10 marks)
Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषा, समाज व संस्कृती ह्यांच्यातील अनुबंध स्पष्ट करा. (20 marks)
Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रयोग म्हणजे काय, ते सांगून कर्तरीप्रयोगाचे उपप्रकार सोदाहरण लिहा. (15 marks)
Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील दैवतकथांचे स्वरूप स्पष्ट करा. (15 marks)
Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोककथागीतांची विविधता सोदाहरण लिहा. (20 marks)
Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषेची मूलभूत कार्ये स्पष्ट करा. (15 marks)
Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: क्रियापदाचे वाक्यातील महत्त्व अधोरेखित करून क्रियापदाचे विविध प्रकार सोदाहरण सांगा. (15 marks)
Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रमाणभाषेपेक्षा अहिराणी बोली कशी वेगळी ठरते, ते सोदाहरण लिहा. (20 marks)
Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सर्वनामाचे प्रकार सांगून पुरुषवाचक सर्वनामाचे अर्थ व उपयोग स्पष्ट करा. (15 marks)
Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्याच्या भाषेचे वेगळेपण विशद करा. (15 marks)
Q5a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: संत नामदेवांचा भावकवी म्हणून परिचय करून द्या. (10 marks)
Q5b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: पंडितकवी म्हणून वामन पंडितांच्या काव्याची वैशिष्ट्ये लिहा. (10 marks)
Q5c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: साहित्य आणि संस्कृती ह्यांचा अनुबंध स्पष्ट करा. (10 marks)
Q5d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: स्वच्छंदतावादाची वैशिष्ट्ये लिहा. (10 marks)
Q5e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: समाजशास्त्रीय समीक्षेची आवश्यकता स्पष्ट करा. (10 marks)
Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘लीळाचरित्रा’च्या निर्मितिप्रेरणा सांगून त्याचे वाङ्मयीन महत्त्व विशद करा. (20 marks)
Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मर्ढेकरांच्या कवितेचे वेगळेपण सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)
Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्याचे मूल्यमापन करण्यात आस्वादक समीक्षा कितपत यशस्वी ठरते, ते साधार लिहा. (15 marks)
Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: समीक्षा म्हणजे काय, ते सांगून साहित्याच्या आकलनात समीक्षेचे महत्त्व स्पष्ट करा. (20 marks)
Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘लावणी’च्या व्युत्पत्तीसंबंधी असलेल्या मतमतांतरांची चर्चा करा. (15 marks)
Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील नवकथेची वैशिष्ट्ये लिहा. (15 marks)
Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “बखर म्हणजे इतिहास आणि वाङ्मय यांचे एकरूप होय”, ह्या विधानाची साधकबाधक चर्चा करा. (20 marks)
Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: दलित कवितेतून दलित चळवळीचे प्रतिबिंब कसे दिसून येते, ते साधार लिहा. (15 marks)
Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष सांगा. (15 marks)
Paper II
Q1a. पुढील पाच उत्ताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: याउपरि मागौतें कामाइसीं म्हणितलेंः ‘भटो रावो मरैलः आणि मातें आगीआंतु घालीतीलः’ भटोबासीं म्हणितलेंः ‘तरि तुम्ही आपुला आदिभावो चुकवाः’ ‘मग ते बळाधिकारें घालीतीलः’ ‘तरि तुम्हा आत्महत्त्येचे नरक नाहीः’ इतुलेनि ते उगींचि राहिलीः मग काही पदार्थ आणिला होताः तो भटोबासांसि संपादिलाः मग आज्ञा घेउनि गावां गेलीः ॥ मग कितीका दिसां रावो निवर्तलाः मग तेही लैसेचि केंलेंः बहुतापरि आपुला आदिभावो चुकवीलाः परी येरी बळाधिकारूचि केलाः (10 marks)
Q1b. पुढील पाच उत्ताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: आता आमच्या नीतिंमान धार्मिक सरकारने केवळ धर्मलोभ एकीकडे ठेऊन शेतकऱ्यांचे आचरणावर डोळा ठेवण्याकरिता डिटेक्टिव्ह डॉक्टरांच्या नेमणूका करून शेतकऱ्यांनी आपल्या गैरशिस्त आचरणावरूनी प्रकृति बिघडविल्यास व चोऱ्या छिनाल्या वगैरे नीच आचरण केल्यास त्यांस योग्य शिक्षा करण्याविषयी चांगला बंदोबस्त केल्याविना ते नीतिवान होणे नाहीत. (10 marks)
Q1c. पुढील पाच उत्ताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: ज्यांना कुठल्याही तऱ्हेची जवळीकच नको वाटते असेही काही असतीलच की जगात. आणिक जवळीक झाल्याखेरीज त्यांना कसं उमजणार की हे नको मला म्हणून? मनात आलं. एक क्रांती व्हायला हवी–सगळ्या या समाजमान्य पद्धती बदलणारी. (10 marks)
Q1d. पुढील पाच उत्ताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: ध्येय असलेली मंडळी अनेक शतकांनी होणारी गोष्ट करण्यास हात घालतात. त्यांच्या आयुष्यात तर काहीच होत नाही, आणि त्यांच्या बायकांमुलांना मात्र त्यांचे ध्येयवादित्त्वाचें फल भोगावे लागते. (10 marks)
Q1e. पुढील पाच उत्ताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: अरे तुम्ही सारे सरकारचे जावई! उगीच गपचीप जे दिले ते खाण्यापेक्षा किरकिर का करायचं? तुम्हाला सरकारनं सारं दिलंय आता फक्त पोरी देयाच्या राहिल्यात. (10 marks)
Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नागदेवाचार्यांच्या ठिकाणी असणाऱ्या बुद्धी व भावना यांचे मनोज्ञ मिश्रण आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची अनुभूती कशाप्रकारे येते? ‘स्मृतिस्थळ’ मधील विविध प्रसंगांच्या आधारे विशद करा. (15 marks)
Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकाच्या लेखनामागील महात्मा जोतीराव फुले यांची विचारधारा स्पष्ट करा. (15 marks)
Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सामाजिक भूमिकेतून कौटुंबिक भावनांचे विश्लेषण श्री. व्यं. केतकरांनी कशारीतीने केले आहे? ‘ब्राह्मणकन्या’ या कादंबरीतील घटना-प्रसंगांच्याद्वारे उलगडून दाखवा. (20 marks)
Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील विनोदांचे विशेष उदाहरणे देऊन विशद करा. (15 marks)
Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहातील कथांमधून उद्याच्या सुंदर, निरामय आणि सशक्त जगाचे स्वप्न बाबुराव बागूल यांनी मांडलेले आहे; असे तुम्हास वाटते का? साधक-बाधक चर्चा करा. (15 marks)
Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: उद्धव शेळके यांच्या कथालेखनात अस्सल मानवतावादी जीवनदृष्टीची अनुभूती कशी येते, ‘शिळान’ या कथासंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. (20 marks)
Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘जन हे वोळतु जेथे’ या कादंबरीतील पात्रांच्या संवाद-विसंवादातून समग्र मानवी जीवनानुभूतीचे प्रत्ययकारी दर्शन कशाप्रकारे होते? सविस्तर लिहा. (15 marks)
Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: आधुनिक जीवनजाणिवेने उपस्थित केलेले पेच उलगडून पाहण्याचा प्रयत्न गौरी देशपांडे यांनी केला आहे; असे तुम्हास वाटते का? सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)
Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठवाड्यातील बोलीचे कोणकोणते विशेष प्र. ई. सोनकांबळे यांच्या ‘आठवणींचे पक्षी’ मध्ये आढळतात, सोदाहरण स्पष्ट करा. (20 marks)
Q5a. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: श्रीमुख साजिरे कुंडले गोमटी। तेथ माझी दृष्टी बैसलीसे॥ १ ॥
कटीवर कर समचरण साजिरे। देखावया झुरे माझे मन॥ २ ॥
माहेरीची आस दसरा दिवाळी। बाहे ठेवी निढळी वाट पाहे॥ ३ ॥ (10 marks)
Q5b. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: राजे असाल तरि धन्य वसुंधरा हे।
शोभाल देव, तरि नाक यथार्थ आहे॥
भोगी तुम्ही उपजलां जरि नागलोकीं।
खाले असोनि सकळांवरि होय तो कीं॥ (10 marks)
Q5c. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: कष्टाची बरि भाजिभाकरी तूप साखरेचि चोरि नको।
आल्या अतिथा मुठभर द्याया मागें पुढती पाहुं नको॥
दिली स्थिती देवानें तींनच मानी सुख कधिं विटू नको।
असल्या गांठी धनसंचय कर सत्कार्या व्यय हटू नको॥ (10 marks)
Q5d. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: भर मार्गात कधी ऐकला तव मंजुळ गान
अडखळुनि थांबतो क्षणभर बेभान
शब्दाशब्दांच्या घटांतून ओसंडे भाव
पारिजातकाच्या फुलांचा कोमल वर्षाव ! (10 marks)
Q5e. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: हा रस्ता अटळ आहे ! अटळ घाण सारी;
अटळ आहे शिसारी.
एक वेळ अशी येईल, घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारीं शिते, उडतील पुन्हां;
होतील भुतें. (10 marks)
Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘आर्त मनाची उत्फुर्त भावकविता’ म्हणून संत नामदेवांच्या अभंगवाणीचे परीक्षण तुमच्या शब्दांत लिहा. (15 marks)
Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: रघुनाथपंडितांच्या कल्पनाचातुर्याचा प्रत्यय ‘दमयंती स्वयंवर’ मध्ये कोणकोणत्या रीतीने येतो त्याचे उदाहरणांसहीत विवेचन करा. (15 marks)
Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: पैंजण मधील पोवाडे म्हणजे ‘मराठयांचा काव्यमय इतिहास आहे’ हे मत तुम्हास योग्य वाटते का? साधक-बाधक चर्चा करा. (20 marks)
Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘एक निसर्ग कवी’ या नात्याने बालकवींच्या कवितांचा परामर्श घ्या. (15 marks)
Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कवितेमध्ये आढळणाऱ्या गूढ प्रतिमांचा अन्वर्यार्थ उलगडून दाखवा. (15 marks)
Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘प्रीती’ आणि ‘क्रांती’ यांचा उद्घोष करणाऱ्या कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ मधील कवितांचा ऊहापोह करा. (20 marks)
Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: कामगारांच्या जीवनानुभवांची यथार्थ आणि कलात्मक संघर्ष चित्रे नारायण सुर्वे यांनी कवितेतून कोणत्याप्रकारे रेखाटलेली आहेत, ते ‘जाहिरनामा’ मधील कवितांच्या आधाराने सांगा. (15 marks)
Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सूक्ष्मनिरीक्षण, बुद्धिवादी दृष्टिकोण आणि विचारांची प्रखरता ही विंदा करंदीकरांच्या कवितेची वैशिष्ट्ये ‘मृदगंध’ मध्ये कशी दिसतात ते विशद करा. (15 marks)
Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या कवितासंग्रहाच्या शीर्षकाची यथार्थता ढसाळ यांच्या कवितांच्या आधारे स्पष्ट करा. (20 marks)
Spotted something wrong?
If a question is in the wrong unit or a match looks wrong, please report an error.
Related: Overall Marathi Literature PYQ analysis · Year-wise question papers · Topic-wise PYQs

