Every question from the Marathi Literature Optional papers of UPSC Mains 2021, placed in its syllabus unit and checked against all questions asked from 2013 to 2020. See what was familiar, what came back and what was new.
Other years:
What stood out in 2021
- More marks than usual: मराठी साहित्याचा इतिहास (175 marks, against an average of 156).
- Fewer marks than usual: साहित्यसमीक्षा (25 marks, against an average of 47).
- One question was a close repeat of an earlier paper: Q5c (Paper II), first seen in 2014.
- Every question came from a topic UPSC had asked recently.
Which units got the marks in 2021
Marks asked from each unit in 2021 (dark bar) against its average for 2013–2020 (grey bar).
Paper I
| Unit | 2021 | Average 2013–20 |
|---|---|---|
| भाषा आणि लोकसाहित्य | 200 | 194 |
| मराठी साहित्याचा इतिहास | 175 | 156 |
| साहित्यसमीक्षा | 25 | 47 |
Paper II
| Unit | 2021 | Average 2013–20 |
|---|---|---|
| विभाग अ: गद्य | 200 | 200 |
| विभाग ब: कविता | 200 | 200 |
A question that fits two units is split equally between them.
Paper I
Q1a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन’ या विधानाची सार्थकता पटवून द्या. (10 marks)
Q1b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: बोलीचे विशेष सांगून बोलीचे महत्त्व विशद करा. (10 marks)
Q1c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठी भाषेच्या प्रमुख बोली सांगून वऱ्हाडी बोलीचे विशेष सोदाहरण स्पष्ट करा. (10 marks)
Q1d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: विभक्तीचे प्रकार प्रत्ययासह विशद करा. (10 marks)
Q1e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लोककथागीत म्हणजे काय हे सांगून लोककथागीताचे वैशिष्ट्ये नोंदवा. (10 marks)
Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषा आणि समाज यांचा सहसंबंध उलगडून दाखवा. (20 marks)
Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: यादवकालीन मराठी भाषेचे वेगळेपण सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)
Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकसाहित्याचे स्वरूप-विशेष विशद करा. (15 marks)
Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषाविज्ञानातील नोम चॉम्स्कीच्या भाषाविषयक संकल्पनाचे विवेचन करा. (20 marks)
Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकरंगभूमीच्या स्वरूप-विशेषाची चर्चा करा. (15 marks)
Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘व्यावहारिक भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी असते’ या विधानाची सार्थकता पटवून द्या. (15 marks)
Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सतराव्या शतकातील मराठी भाषेवरील प्रभावाची चर्चा करा. (20 marks)
Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शब्दाच्या जाती सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)
Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रयोगाचे प्रकार सांगून भावेप्रयोगाचे पोटप्रकार सोदाहरण लिहा. (15 marks)
Q5a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: महानुभाव संप्रदायातील साती काव्यग्रंथांचा थोडक्यात परिचय करून द्या. (10 marks)
Q5b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘जातीहीनतेचे दुःख वारकरी संतांच्या अभंगातून प्रगट झाले आहे’ याचे साधार विवेचन करा. (10 marks)
Q5c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लावणीचे रचना-विशेष सोदाहरण उलगडून दाखवा. (10 marks)
Q5d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: उपयोजित समीक्षेचे कार्य स्पष्ट करा. (10 marks)
Q5e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ग्रामीण कवितेचा थोडक्यात आढावा द्या. (10 marks)
Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘महात्मा जोतीराव फुले यांची साहित्यविषयक कामगिरी मोलाची आहे’ या विधानाची सार्थकता स्पष्ट करा. (20 marks)
Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: पंडिती काव्याचे स्वरूप आणि विशेष सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)
Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यसमीक्षेचे स्वरूप सांगून ठळक उद्दिष्टे नोंदवा. (15 marks)
Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साठोतर मराठी कादंबरीचे योगदान अधोलेखित करा. (20 marks)
Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: स्वातंत्र्यानंतरच्या मराठी कथेचे बदलते स्वरूप उलगडून दाखवा. (15 marks)
Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: दलित आत्मकथनांचे भारतीय साहित्यातील योगदान स्पष्ट करा. (15 marks)
Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘स्वातंत्र्योतर मराठी कवितेने सामाजिक जाणिवेची व्यापक अभिव्यक्ती केली आहे’ या विधानाची सार्थकता सोदाहरण स्पष्ट करा. (20 marks)
Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मराठीतील स्त्रीवादी कादंबरी म्हणजे स्त्रीच्या आधुनिकवृतीची नवी सूत्रे आहेत’ याचे सोदाहरण विवेचन करा. (15 marks)
Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘सामाजिक चळवळीच्या परिणामातून साहित्य चळवळी प्रभावित झाल्या’ हे साठोतरी साहित्यप्रवाहाच्या संदर्भाने स्पष्ट करा. (15 marks)
Paper II
Q1a. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: महदाइसी म्हणितले सृष्टीमध्ये देवो दुर्लभः कां देवाते आठवी तो दुर्लभु: ॥: शोधु: ॥: मग तयाते खालि ठेऊनि भिक्षा मागितली: ॥: (10 marks)
Q1b. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: अरे, मी या अभागी दुष्टाने माझ्यावरील अरिष्ट टाळण्याकरितां माझ्या सगुणाचा गळा कापून तिच्या नांदण्याचे चांदणे केले! आता मी हल्ली सालचा शेतसारा द्यावा तरी कोठून? (10 marks)
Q1c. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: काव्य खावे काव्य पावे। काव्य घ्यावे सारखे।
काव्य गावे काव्य घ्यावे। बडबडावे अन् मुखे।
काव्य ल्यावे नखशिखी अन्। काव्य घ्यावे मस्तकी।
काव्य छातीवरी धरोनी। अन् मरावे शेवटी। (10 marks)
Q1d. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: क्रांतीचे विद्यापीठ असलेल्या नगरीचा मी श्रमशूर नागरिक आहे. माझे हात भारताच्या प्रगतीचे रथ आहेत. मी नव्या सार्वत्रिक सुखाचा शिल्पकार, मानवतेसाठी लढणारा, मरणारा झुंजार… (10 marks)
Q1e. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: परंतु मी जसजसा मोठा होऊ लागलो तसतसं मला कळायला लागलं की तिच्यावर दाजी व आत्याचा धाक आहे म्हणून ती मला बोलतीया. नसता कशाला बोलली असती बिचारी. (10 marks)
Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘स्मृतिस्थळ’ या ग्रंथाची वैशिष्ट्ये लिहून महानुभाव संप्रदायातील त्याचे महत्त्व विशद करा. (15 marks)
Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “मानवी प्रवृत्तींचे भडक विडंबन ‘साष्टांग नमस्कार’ मध्ये कसे केले आहे” या मताची चर्चा करा. (15 marks)
Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘शिळान’ च्या आधारे उधव शेळके यांच्या अनुभवविश्वाचे सामर्थ्य काय आहे आणि हे अनुभवविश्व सीमित आहे का याची चर्चा करा. (20 marks)
Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘गरिबी आणि पोरकेपणामुळे सहन कराव्या लागलेल्या सोनकांबळे यांच्या आठवणी म्हणजे साक्षात निखारे आहेत’ या मताची चर्चा करा. (15 marks)
Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणती सुधारणा व्हावी असे महात्मा फुले यांना वाटते ते ‘शेतकऱ्याचा आसूड’ च्या आधारे लिहा. (15 marks)
Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: माझी भूमिका शिक्षकाची आहे ही केतकरांची भूमिका ‘ब्राह्मणकन्या’ मधून कशी व्यक्त होते ते लिहा. (20 marks)
Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘जन हे वोळतू जेथे’ मधील नायकाच्या भोवतालचे विश्व आणि त्याची संवेदनशीलता यांतील संघर्ष चित्रित करा. (15 marks)
Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भारतीय समाजव्यवस्थेतील जाती-जाती मधील संघर्ष व तेढ बाबुराव बागुलांच्या कथेतून कशी अभिव्यक्त झाली ते लिहा. (15 marks)
Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: गौरी देशपांडे यांच्या ‘एकेक पान गळावया’ या कादंबरीत समाजातील स्त्रीचे शोषण कसे दाखवले आहे ते लिहा. (20 marks)
Q5a. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: हे मंद-मंद पद सुंदर कुंद-दंती
चाले जसा मद-धुरंधर इंद्र दंती
हंसा धरु जवळि जाय कृशोदरी ते
निष्कंप-कंकण-करासि पुढे करीते. (10 marks)
Q5b. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: रण काय भयानक लोळे आग जळत!
आदळती, वळती, आवळती क्रोधात
जणुं जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आजाद-घनांशी झुंजे वादळ-वात! (10 marks)
Q5c. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. (10 marks)
Q5d. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: कुणीकडे हा झुकतो वारा!
हांका मारी जीव कुणाला!
मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला. (10 marks)
Q5e. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: कधी याचितों सन्; कधी स्वप्न याची,
कधी धांवतो काळ टाकून मागें.
कधी वर्णतों अमृताच्या सरी अन्
कधी मृत्युची भाबडी भीक मागें. (10 marks)
Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: जगणे कठीण असल्याचा आक्रोश आणि नरकतुल्य जीवनात बेचैन झालेल्या मनाची व्यथा नारायण सुर्व्यांच्या कवितेत कशी उमटली आहे याचे विवेचन करा. (15 marks)
Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: निसर्ग आणि औदासिन्य हे बालकवींच्या अनुभवविश्वाचे महत्त्वाचे घटक त्यांच्या कवितेत कसे प्रत्यंतरास येतात ते स्पष्ट करा. (15 marks)
Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘विठ्ठलमाऊलीचे ठिकाणी नितांत प्रेमभावना हाच भागवतधर्म, हाच भक्तीमार्ग आणि हेच वारकरी पंथाचे रहस्य होय.’ या विधानाची सार्थता संत नामदेवांच्या अभंगांच्या आधारे पटवून द्या. (20 marks)
Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: वातावरणनिर्मिती, शब्दसमृद्धी, नाट्यमयता ही रघुनाथ पंडितांच्या कलाविलासाची लक्षणे ‘दमयंती स्वयंवराच्या’ आधारे स्पष्ट करा. (15 marks)
Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘विशाखाने एक पिढी घडवली इतके ओज व तेज कुसुमाग्रजांच्या कवितेत आहे’ या विधानाची चर्चा करा. (15 marks)
Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेव ढसाळांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील संघर्ष ‘या सत्तेत जीव रमत नाही’ मधून कसा चितारला आहे ते लिहा. (20 marks)
Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मृद्गंध’ या कवितासंग्रहातील प्रतिमांची विविधता व नाविन्य यांचे विवेचन करा. (15 marks)
Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘संध्याकाळच्या कविता’ मधील अनुभवांचे स्वरुप स्पष्ट करुन त्या कविता दुर्बोध अर्थदृष्ट्या संदिग्ध का वाटतात ते लिहा. (15 marks)
Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी काव्य हे अस्सल मराठी काव्य आहे हे ‘पैंजण’ च्या आधारे पटवून द्या. (20 marks)
Spotted something wrong?
If a question is in the wrong unit or a match looks wrong, please report an error.
Related: Overall Marathi Literature PYQ analysis · Year-wise question papers · Topic-wise PYQs

