Menu Close

विभाग ब: कविता – Marathi Literature Optional PYQs (Paper II, Unit 2)

Here are all 234 questions on विभाग ब: कविता asked in UPSC Marathi Literature Optional Paper II (2009–2026), arranged under the 9 topics of this unit. Within each topic the latest questions come first.

Each question ends with a code such as [2024/15m/3b] – the year, the marks, the word limit (where UPSC set one) and the question number in the paper.

Topic-wise weightage graph of विभाग ब: कविता, Marathi Literature Optional Paper II
Topic-wise weightage of विभाग ब: कविता (Marathi Literature Optional Paper II) – share of marks asked from each topic.

2.1] ‘नामदेवांची अभंगवाणी’

26 questions

  1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: नदीचिया माशा घातलें माजवण। तैसें जनवन कलवलें॥
    दाही दिशा धुंद उदयास्तावीण। तैसेंची गगन कालवलें॥
    जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी। पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली॥
    ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा। पादपद्मीं ठेवा निरंतर॥ [2026/10m/5a]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “बुद्धी आणि भावना यांचा सुरेख संगम नामदेवांच्या अभंगवाणीत अनुभवास येतो”, या विधानाचे विश्लेषण करा. [2026/15m/6a]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेवांच्या उपदेशवाणीचे सार तुम्ही अभ्यासलेल्या अभंगांच्या आधारे थोडक्यात लिहा. [2025/15m/6a]

  4. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: सुई आणि सातुळी कात्री गज दोरा। मांडिला पसारा सदाशिवी नामा म्हणें शिवीं विठोबाचे अंगी। त्याचेनि मी जगी धन्य झालो॥ [2024/10m/5a]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “नामदेवाच्या अंतरंगाचे अत्यंत स्वच्छ व नितळ प्रतिबिंब त्यांच्या अभंगवाणीत पाहावयास मिळते.” या विधानाची सत्यता पटवून द्या. [2024/15m/6a]

  6. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: श्रीमुख साजिरे कुंडले गोमटी। तेथ माझी दृष्टी बैसलीसे॥ १ ॥
    कटीवर कर समचरण साजिरे। देखावया झुरे माझे मन॥ २ ॥
    माहेरीची आस दसरा दिवाळी। बाहे ठेवी निढळी वाट पाहे॥ ३ ॥ [2023/10m/5a]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘आर्त मनाची उत्फुर्त भावकविता’ म्हणून संत नामदेवांच्या अभंगवाणीचे परीक्षण तुमच्या शब्दांत लिहा. [2023/15m/6a]

  8. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: हडबडलीं पातकें। घेता रामनाम एकें॥
    नाम घेतां ततक्षणीं। चित्रगुप्तें सांडिली लेखणी॥
    घेऊनि पूजेचा संभार। ब्रह्मा येतसे समोर॥
    नामा म्हणे जरी हे लटकें। तरी छेदावें मस्तक॥ [2022/10m/5a]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेवांच्या अभंगांतून वत्सल आणि करुण हे दोन्ही रस अभिव्यक्त झाले आहेत, कसे ते सोदाहरण लिहा. [2022/15m/6a]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘विठ्ठलमाऊलीचे ठिकाणी नितांत प्रेमभावना हाच भागवतधर्म, हाच भक्तीमार्ग आणि हेच वारकरी पंथाचे रहस्य होय.’ या विधानाची सार्थता संत नामदेवांच्या अभंगांच्या आधारे पटवून द्या. [2021/20m/6c]

  11. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “कृपेची साउली अखंड लाधली । खेचर माउली भेटलीया
    आतां मज भय नाही पै कोणाचे । जन्ममरणाचे दुःख गेले
    बंधमोक्षाची फिटली काळजी । समाधि लागली समाधीसी
    नामा म्हणें माझें सर्वही साधन । खेचरचरण न विसंबे.” [2020/10m/5e]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेवांची भक्तिभावना त्यांच्या भावकवितेतून एका भाविक भक्ताच्या भूमिकेतून आविष्कृत होते–कशी ते सोदाहरण स्पष्ट करा. [2020/15m/6a]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेवांच्या काव्यजाणिवेतील भावनिष्ठतेचे सोदाहरण विवेचन करा. [2019/15m/8b]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “अंतर्मुखता, आत्मपरता आणि जिव्हाळा हा नामदेवांच्या कवितेचा गाभा आहे.” चर्चा करा. [2018/15m/6a]

  15. पुढील पाच उताऱ्यांचे 150 शब्दांत रसग्रहणात्मक सटीक विवेचन करा. भक्त विठोबाचे भोळे । त्यांचे पायी ज्ञान लोळे
    भक्ति विण शब्दज्ञान । व्यर्थ अवघे ते जाण
    नाही ज्याचे चित्ती भक्ति । जळो तयाची व्युत्पत्ति
    नामा म्हणे ऐसे जाण । नाही भक्तिसी बंधन [2017/10m/5e]

  16. भक्ति आणि लोकोपदेश या आशयावरील संत नामदेवांच्या अभंगांचा ‘नामदेवांची अभंगवाणी’च्या आधारे परामर्श घ्या. [2017/15m/6a]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेवांच्या अंतरंगाचे अत्यंत स्वच्छ व नितळ प्रतिबिंब त्यांच्या अभंगवाणीतून कसे प्रकट झाले आहे, ते विचार करा. [2016/15m/7a]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेल्या नामदेवांच्या अभंगवाणीच्या आधारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कोणकोणते विशेष कशा प्रकारे प्रकट झाले आहेत, ते सोदाहरण स्पष्ट करा. [2015/15m/6a]

  19. पुढील पाच पद्यखंडांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा:– “मुखी नाम हाती टाळी। दया नुपजे कोणे काळी॥
    काय करावे ते गाणे। धिक् धिक् ते लाजिर, वाणे॥
    हरिदास म्हणोनी हालवी मान। कवडीसाठी घेतो प्राण॥
    हरिदासाचे पायी लोळे। केशी धरोनी कापी गळे॥” [2014/10m/5e]

  20. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:– ज्ञानदेवांच्या कार्याचे वर्णन नामदेवांनी कसे केले आहे, आणि त्यातून त्यांच्या ज्ञानदेवांविषयीच्या भावना कशा व्यक्त होतात, ते सांगा. [2014/15m/6a]

  21. पुढील पाच पद्यखण्डांची प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: नवमास गर्भवासी। कष्ट जाले त्या मातेसी।
    ते निष्ठुर जाली कैसी। अंती दूर राहिली। [2013/10m/5a]

  22. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा: नामदेवांनी कृष्णकथेच्या मानाने रामकथेचा विस्तार अल्प प्रमाणातच केला आहे, ह्या विधानाचा साधार परामर्ष घ्या. [2013/15m/6a]

  23. पुढील पाच पद्यखंडाचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा. गूळ गोड न लागे म्हणावा । तैसा देव न लागे वानावा ।
    सेवि तोचि चवी जाणे । येरां सांगतां लाजिरवाणें ।
    नाभा म्हणे या खुणा । तुम्ही ओळखा पंढरिराणा ॥ [2012/12m/5a]

  24. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा. नामदेवांच्या काव्यरचनेतील भावनेची विविधता सोदाहरण स्पष्ट करा. [2012/20m/6a]

  25. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वाचे निर्मळ प्रतिबिंब त्यांच्या अभंगवाणीतून कसे पडले आहे? ते सांगा. [2011/30m/6a]

  26. पुढीलपैकी कोणत्याही तीन पद्यखंडांचे रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: पतितपावन नाम ऐकुनी आलों मी द्वारा ।
    पतितपावन नव्हेसि म्हणुनी जातों माघारा ॥१॥
    घ्यावें तेव्हां द्यावें ऐसा अससी उदार ।
    काय धरूनि देवा तुझें कृपणाचें द्वार ॥२॥
    सोडी ब्रीद देवा आतां नव्हेसी अभिमानी ।
    पतितपावन नाम तुझें ठेवियलें कोणी ॥३॥
    झेंगट घेउनी हातीं दवंडी पिटीत तिन्ही लोकीं ।
    पतितपावन देवा परी तूं मोठा घातकी ॥४॥
    नामा म्हणे देवा तुझें न लगे मज कांहीं ।
    प्रेम असोंदे चित्तीं म्हणूनि लागतसे पायीं ॥५॥ [2010/20m/5a]

Cover of the UPSC Prelims Topic-wise PYQ book with detailed explanations

From the Optional Province team

Preparing for Prelims too?

Our UPSC Prelims Topic-wise PYQ Book covers every Prelims question with detailed explanations, so you can see exactly where UPSC asks from. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

2.2] ‘पैंजण’ (संपा. म. ना. अदवंत)

31 questions

  1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: आम्हि मुशाफर लोक प्रीत करूं पाहतों साजणी।
    दीपकळीचा रंग पाहुनी पतंग झुरतो मनीं॥ ध्रु.॥ [2026/10m/5c]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “शृंगार रस आणि वीररस ही शाहिरी कवितेची बलस्थाने होत”, कसे ते ‘पैंजण’च्या आधारे स्पष्ट करा. [2026/15m/6b]

  3. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: श्रीरंग गोपिकोत्संग धरुनि करि रंग हरी हा बाई।
    कुंजांत मातला वसंत सांगु मी काई॥ [2025/10m/5a]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मराठमोळ्या स्त्रीचे सौंदर्य व तिच्या साजशृंगाराचे ढंगदार वर्णन हे लावणीचे महत्वाचे वैशिष्ठ्य होय,’ पैंजण संग्रहाच्या आधारे साधक-बाधक चर्चा करा. [2025/15m/6b]

  5. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: सुंदरा मनामधिं भरली जरा नाहि ठरली हवेलिंत शिरली मोत्याचा भांग
    रे गड्या हौस नाहिं पुरलि म्हणोनी विरलि पुन्हा नाहिं फिरलि कुणाची सांग॥ [2024/10m/5b]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी वाङ्मयाला ‘मराठी काव्याची प्रभात’ असे का म्हटले जाते ते स्पष्ट करा. [2024/15m/6b]

  7. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: कष्टाची बरि भाजिभाकरी तूप साखरेचि चोरि नको।
    आल्या अतिथा मुठभर द्याया मागें पुढती पाहुं नको॥
    दिली स्थिती देवानें तींनच मानी सुख कधिं विटू नको।
    असल्या गांठी धनसंचय कर सत्कार्या व्यय हटू नको॥ [2023/10m/5c]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: पैंजण मधील पोवाडे म्हणजे ‘मराठयांचा काव्यमय इतिहास आहे’ हे मत तुम्हास योग्य वाटते का? साधक-बाधक चर्चा करा. [2023/20m/6c]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘शाहिरी काव्य महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आहे’ हे विधान ‘पैंजण’च्या आधारे पटवून द्या. [2022/20m/6c]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी काव्य हे अस्सल मराठी काव्य आहे हे ‘पैंजण’ च्या आधारे पटवून द्या. [2021/20m/8c]

  11. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “पोट भराया उभारिला ना तमाशाचा धंदा।
    महाल मोकासे जहरी वळसे करितील अपुला बंदा।
    सुईदोऱ्याला हयात असों द्या तोचि इनाम मोकासा।
    निजकर्मी रत नर झाल्यावर काय उणा मग त्या पैसा।” [2020/10m/5b]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी कवितेने सामान्य व्यक्तींच्या लौकिक जीवनाचा प्रभावी आविष्कार कसा केला आहे, ते सोदाहरण पटवून द्या. [2020/20m/6c]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “शाहिरांच्या लावण्या वाचू लागलो म्हणजे पेशवेकाळाच्या अखेर अखेर आढळणाऱ्या रंगेलपणाचे, सुखविलासी वृत्तीचे, बेफिकीरपणाचे दर्शन आपणांला अधिक होते.” या विधानाचे ऐतिहासिक व वाङ्मयीन साधर्म्य, वैधर्म्य नोंदवा. [2019/15m/6a]

  14. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा: सुंदरा मनामधि भरलि जरा नाहि ठरली
    हवेलिंत शिरली मोत्याचा भांग।
    रे गड्या हौस नाहि पुरलि म्हणोनी विरली
    पुन्हा नाहि फिरलि कुणाची सांग॥ [2018/10m/5a]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी वाङ्मयाला ‘मराठी काव्याची प्रभात’ असे कोगी म्हटले ते सांगून पैंजण या संग्रहाच्या आधारे अशा संशोधनाच्या सार्थकतेविषयीची चर्चा करा. [2018/20m/6c]

  16. पुढील पाच उताऱ्यांचे 150 शब्दांत रसग्रहणात्मक सटीक विवेचन करा. अंबरगत परी पयोधराते रगडुनि पळतो दुरी
    काय हा धीट म्हणावा तरी
    तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हैया हरी
    नव्हे गे मारूत मेघोदरी ॥ [2017/10m/5a]

  17. ‘पैंजण’च्या आधारे लावणी वाङ्मयाची साधार वैशिष्ट्ये लिहा. [2017/20m/6c]

  18. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी।
    झड घालुन प्राण देतो दीपकाचे वरी।
    हे मी सांगत असतांना कांगे पडले भरी।
    रत्न टाकून पदरांत गार घेऊ नकोरे॥ [2016/10m/5e]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “शाहिरी कविततेच्या प्रेरणा स्वतंत्र असल्याने त्यांचा आविष्कारही स्वतंत्र आहे.” साधार चर्चा करा. [2016/15m/7b]

  20. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: दो दिवसांची तनु ही साची सुरतरसाची करूनि मजा।
    गमजा करितां मनिं उमजाना हें सुख न पुढें पडेल वजा॥ भाइ सावध व्हा॥ [2015/10m/5b]

  21. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘पैंजण’ मधील लावण्यांमधून कवींच्या सौंदर्यदृष्टीची वैशिष्ट्ये कशा प्रकारे आविष्कृत झाली आहेत ह्या विषयाची समीक्षा करा. [2015/15m/6b]

  22. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:– संतांच्या आणि पंडितांच्या कवितेपेक्षा शाहिरी काव्य अगदी वेगळ्या प्रकारचे कसे होते, त्याचे विवेचन ‘पैंजण’ मधील कवितांच्या आधारे करा. [2014/20m/6b]

  23. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा: म० ना० अदवंत यांनी संपादित केलेल्या ‘पैजण’ संग्रहातील काव्याविष्काराचे मराठी साहित्येतिहासातील महत्त्व अधोरेखित करा. [2013/20m/6c]

  24. पुढील पाच पद्यखंडाचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा. धन्य वंश एकेक पुरुष जणुं कल्पवृक्ष पिकले ।
    शतवर्षें द्विज पक्षी आनंदें त्या तरुवर टिकले ॥
    जलचर हैदर नबाब सन्मुख रण करितां थकले ।
    ज्यांनीं पुण्याकडे विलोकिलें ते संपत्तिला मुकले ॥ [2012/12m/5c]

  25. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा. शाहिरांच्या लावण्यापोवाड्यांतून घडणाऱ्या समाजदर्शनाचे परीक्षण करा. [2012/20m/6c]

  26. पुढील चार पद्यखंडाचे रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: जगीं सांगतात प्रीत पतंगाची खरी ।
    झड घालुन प्राण देतो दीपकाचे वरी ।
    हे मी सांगत असतांना कांगे पडले भरी ।
    रत्न टाकून पदरांत गार घेऊं नकोरे ॥ [2011/15m/5b]

  27. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. मराठी लावणीवाङ्मयाचे विशेष ‘पैंजण’ च्या आधारे विशद करा. [2011/30m/6b]

  28. “राजकीय जीवनाप्रमाणेच शाहिरी कवनांतून आविष्कृत झालेल्या सामाजिक जीवनांतहि अपुरेपणा जाणवतो – एकांगीपणा जाणवतो.” या विधानाच्या संदर्भात ‘पैंजण’ या संग्रहातील काव्यातील सामर्थ्य आणि मर्यादांविषयी ऊहापोह करा. [2010/60m/6]

  29. पुढीलपैकी कोणत्याही तीन पद्यखंडांचे रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: “जुने कायदे अगदी मोडले जधीपुन आले इंग्रजी
    कांदा-भाकर एक्या मोले तुपसाकर मैदासोजी
    मोठे मोठे उमराव धारकरी जरब चहूंकडे दरारा
    राव्यापरी पिंजऱ्यात कोंडले मायेणीचा चंदीचारा ॥”. [2009/20m/5a]

  30. पुढीलपैकी कोणत्याही तीन पद्यखंडांचे रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: “भला जन्म हा तुला लाधला खुलास हृदयीं बुधा ।
    धरिशि, तरि हरिचा सेवक सुधा ॥ ध्रु ॥
    चराचरीं गुरू तरावयाला नरा शिरावरि हरीं ।
    जरा तरि समज धरीं अंतरीं ॥
    हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरीं ।
    मठाची उठाठेव कां तरी ॥
    वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावें परी ।
    हरीचें नांव भवांबुधितरी ॥
    काय गळ्यांत घालुनि तुळशीची लांकडें ।
    ही काय भवाला दुर करतिल मांकडें ॥
    बाहेर मिरविशी आंत हरिशिं वांकडें ।
    अशा भक्तिच्या रसारहित तूं कसा म्हणविशी बुधा ॥
    हरीरस सांडुनि घेशी दुधा ॥ 1 ॥ [2009/20m/5d]

  31. “राष्ट्राच्या अंगात – राष्ट्रातील नागरिकांत – सामर्थ्य आणि वीररस खेळत असल्यामुळे त्यांच्या आविष्कारार्थ पोवाडे आणि लावण्या रचल्या गेल्या.” ‘पैंजण’च्या आधारे, ‘महाराष्ट्र सारस्वत’ कार वि. ल. भावे यांच्या या मताचे समीक्षण करा. [2009/60m/7]

2.3] रघुनाथ पंडित

32 questions

  1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: म्हातारी उडतां न येच तिजला माता मदीया तसी।
    माता काय वदों; नवप्रसव ‘ते’ सातां दिसांची असी॥
    त्राता त्या उभयांस मी मज विधी घातास योजीतसे।
    हातामाजि नृपाचिया गवसलों आतां करावें कसें॥ [2026/10m/5b]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘आख्यानकाव्या’ची गुणवैशिष्ट्ये सांगून ‘दमयंती-स्वयंवरा’त ती कशी दिसून येतात, ते विशद करा. [2026/20m/6c]

  3. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: प्रकट तिजपुढारी जाहला राजमौळी।
    पदर परि न घेतां हार तैसा झळाळी॥
    निज हृदयनिवासी काय बाहेरि आला।
    निरखुनि दमयंती तेंवि मानी तयाला॥ [2025/10m/5b]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘भावनोत्कटतेपेक्षा कल्पनाविलासात रघुनाथ पंडित अधिक रमतो,’ ‘दमयंती-स्वयंवरा’च्या आधारे या विधानाचा परामर्श घ्या. [2025/20m/6c]

  5. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: त्यातील एक कलहंस तटी निजेला
    जो भागला जलविहार विशेष केला
    पोटीच एक पद, लांबविला दुजा जो
    पक्षी तनू लपवि, भूप तया पाहतो. [2024/10m/5c]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: रघुनाथ पंडितांच्या ‘दमयंती स्वयंवर’ या आख्यान काव्याची कलात्मक वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. [2024/20m/6c]

  7. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: राजे असाल तरि धन्य वसुंधरा हे।
    शोभाल देव, तरि नाक यथार्थ आहे॥
    भोगी तुम्ही उपजलां जरि नागलोकीं।
    खाले असोनि सकळांवरि होय तो कीं॥ [2023/10m/5b]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: रघुनाथपंडितांच्या कल्पनाचातुर्याचा प्रत्यय ‘दमयंती स्वयंवर’ मध्ये कोणकोणत्या रीतीने येतो त्याचे उदाहरणांसहीत विवेचन करा. [2023/15m/6b]

  9. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: ऐक राया तूं थोर दयासिंधू। नीतिसुंदर तूं, तूंचि दीनबंधू॥
    निखंदूनी बोलिलों नको मंदूं। सकल-वंदनीय पाय तुझे वंदूं॥
    पारधीमाजी खगा मृगाराजे। करिति हिंसा जे ते बरीच साजे॥
    तुवां दिधली मज मोकळीकगाजे। दया केली हे कीर्ति तुझी गाजे॥
    हंस मिळणेच कठीण महीलोकी। सोनयाचा तो नवल हें विलोकीं॥
    तशा मजलाही सोडिलें तुवा की। तुझा ऐसा उपकार मी न झांकीं॥ [2022/10m/5b]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘रघुनाथ पंडिताची वर्णनशैली ही श्रेष्ठ दर्जाची होती’, हे मत ‘दमयंती स्वयंवर’च्या आधारे स्पष्ट करा. [2022/15m/7a]

  11. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: हे मंद-मंद पद सुंदर कुंद-दंती
    चाले जसा मद-धुरंधर इंद्र दंती
    हंसा धरु जवळि जाय कृशोदरी ते
    निष्कंप-कंकण-करासि पुढे करीते. [2021/10m/5a]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: वातावरणनिर्मिती, शब्दसमृद्धी, नाट्यमयता ही रघुनाथ पंडितांच्या कलाविलासाची लक्षणे ‘दमयंती स्वयंवराच्या’ आधारे स्पष्ट करा. [2021/15m/7a]

  13. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “मूलि उपवर हे जाहसी इयेला
    पाहिजे की वर योग्य पाहिजेला
    अशा ऐकोनि वधूचिया बोला
    सैंवराचा मग यत्न नृपें केला.” [2020/10m/5a]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘दमयंती-स्वयंवर’ या आख्यानकाव्यात रम्य स्थलवर्णने व मुग्ध शृंगारवर्णने यांच्यामुळे सौंदर्य आले आहे, स्पष्ट करा. [2020/15m/6b]

  15. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा: “टाकी उपानह पदें अति मंद ठेवी।
    केली विजार वरि डौरहि मौन सेवी॥
    हस्तीं करी वलय उंच अशा उपायीं।
    भूपें हळूच धरिला कलहंस पायीं॥” [2019/10m/5a]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘दमयंती स्वयंवर’ या काव्यातील अलंकारयोजनेची विविधता सोदाहरण स्पष्ट करा. [2019/20m/6c]

  17. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा: प्रकट तिजपुढारी जाहला राजमौळी
    पदर बरि न घेतां हार तैसा झळाळी
    निजहृदयनिवासी काय बाहेरि आला
    निरखुनि दमयंती तेंवि मानी तयाला [2018/10m/5b]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘दमयंती-स्वयंवर’ या काव्याच्या आधारे रघुनाथपंडितांच्या काव्यगुणां विष्काराचा परामर्श घ्या. [2018/15m/6b]

  19. पुढील पाच उताऱ्यांचे 150 शब्दांत रसग्रहणात्मक सटीक विवेचन करा. ती शीतलोपचारी जागी झाली हळूच मग बोले
    ‘औषध नलगे मजला’; परिसुनि जननी बरे म्हणोनि डोले. [2017/10m/5b]

  20. पंडिती काव्यातील एक सर्वोत्तम रचना म्हणून ‘दमयंति-स्वयंवर’ या काव्याचे सौंदर्य उलगडून दाखवा. [2017/15m/6b]

  21. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: गजबज बहु जाली माय धांवोनि आली।
    धरुनि हृदयेशी तिजला सेज केली॥
    करिति विजणवारे त्या सख्या वेगळाल्या।
    वडिलवडिल दाया जाणत्याही मिळाल्या॥ [2016/10m/5b]

  22. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “काव्यगुणांच्या दृष्टीने दमयंतीस्वयंवर हे प्राचीन मराठीतील सर्वश्रेष्ठ मानले पाहिजे.” विवेचन करा. [2016/20m/7c]

  23. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: मंदाकिनीमधिल जी कनकारविंदें।
    तीं जेवितों मृदुलनालमृणालकंदें।
    आम्ही असों नृपसुते तरि कांचनाचे।
    जें कार्य तें धरिल कीं गुण कारणाचे॥ [2015/10m/5a]

  24. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: पंडिती काव्याची कोणकोणती वैशिष्ट्ये रघुनाथपंडितांच्या ‘दमयंतीस्वयंवरा’ मध्ये पाहावयास मिळतात, ते साधार सांगा. [2015/20m/6c]

  25. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:– ‘दमयंतीस्वयंवर’ या काव्यातील प्रसंगनिर्मितीचे कौशल्य वर्णन करा. [2014/15m/6c]

  26. पुढील पाच पद्यखण्डांची प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: गजबज बंह् जाली माय धांवोनि आली। धरुनि हृदयदेशीं तीजला सेज केली॥
    करिति विजणवारे त्या सख्या वेगळाल्या। वडिलवडिल दाया जाणत्याही मिळाल्या॥ [2013/10m/5b]

  27. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा: रघुनाथपंडित-विरचित ‘दमयंतीस्वयंवर’ या काव्याची वर्णनशैली ही संस्कृतनिष्ठ आहे, ह्या विधानाशी संबंधित साधार साधकबाधक चर्चा करा. [2013/15m/6b]

  28. पुढील पाच पद्यखंडाचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा. तदितर खग भेणें वेगळाले पळाले
    उपवनजलकेली जे कराया मिळाले ।
    स्वजन गवसला जो त्याजपाशीं नसे तो
    कठिण समय येतां कोण कामास येतो ॥ [2012/12m/5b]

  29. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा. पंडिती काव्याचे कोणकोणते विशेष ‘दमयंती स्वयंवरा’त आढळतात? साधार लिहा. [2012/20m/6b]

  30. पुढील चार पद्यखंडाचे रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: मंदाकिनीमधिल जीं कनकारविदें ।
    तीं जेवितों मृदुलनालमृणालकंदें ।
    आम्ही असों नृपसुते तरि कांचनाचे ।
    जें कार्य तें धरिल कीं गुण कारणाचे ॥ [2011/15m/5a]

  31. पुढीलपैकी कोणत्याही तीन पद्यखंडांचे रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: “हें अंतरंग पिवळे सरसीरुहाचें ।
    भासे मनांत मज अंग तसें तियेचें ॥
    गोरोचनापरिस गौर असें गणावें ।
    सोनेंच बावनकसें न कसें म्हणावें?” [2009/20m/5b]

  32. ‘दमयन्ती स्वयंवर’ या काव्यकथेचे मूलस्रोत कोणते ते थोडक्यात सांगून, त्यावर रघुनाथ पंडिताने आपल्या विदग्ध व तरल कल्पनाशक्तीने सुरेख साज चढविला आहे, तो कसा त्याची चिकित्सा करा. [2009/60m/6]

2.4] बालकवी

26 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बालकवींच्या काव्याच्या भाषाशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. [2026/15m/7a]

  2. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: कोठुनि येते मला कळेना
    उदासीनता ही हृदयाला।
    काय बोचते ते समजेना
    हृदयाच्या अंतर्हृदयाला। [2025/10m/5e]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बालकवींच्या कवितेतून निसर्गाचे विविध विभ्रम कसे साकार झालेले आहेत ते सोदाहरण वर्णन करा. [2025/15m/7a]

  4. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: अनेक असले खेळ करुं प्रेमाशा विश्वांत भरुं,
    सोडुनिया अपुले श्वास खेळवु नाचवु उल्हास
    प्रभातकाळी नामनिराळी
    होउनिया आपण राहू लोकांच्या मौजा पाहूं [2024/10m/5e]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बालकवींच्या कवितांमधून दिसून येणाऱ्या निसर्गाच्या विविध भावछटा उलगडून दाखवा. [2024/15m/7a]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘एक निसर्ग कवी’ या नात्याने बालकवींच्या कवितांचा परामर्श घ्या. [2023/15m/7a]

  7. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: भिंत खचली, कलथून खांब गेला,
    जुनी पडकी उद्‌ध्वस्त धर्मशाला;
    तिच्या कौलारीं बसुनि पारवा तो
    खिन्न नीरस एकांतगीत गातो. [2022/10m/5c]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘उदासिनता हा बालकवींच्या कवितांचा मुख्य स्वर आहे’ या विधानाची यथार्थता पटवा. [2022/15m/7b]

  9. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: कुणीकडे हा झुकतो वारा!
    हांका मारी जीव कुणाला!
    मुक्या मनाचे मुके बोल हे
    घरे पाडिती पण हृदयाला. [2021/10m/5d]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: निसर्ग आणि औदासिन्य हे बालकवींच्या अनुभवविश्वाचे महत्त्वाचे घटक त्यांच्या कवितेत कसे प्रत्यंतरास येतात ते स्पष्ट करा. [2021/15m/6b]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘निसर्गाकडे व त्यातील सौंदर्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी हा बालकवींचा मराठी कवितेला प्रेमाचा आहेर आहे’ या विधानाची यथार्थता पटवा. [2020/15m/7a]

  12. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा: “ब्रह्मांडाची सदाफूली। अक्षयते मध्ये फुलली
    फुले तिची बघता नयनी। वेड भरुनि अंतःकरणी
    फूलपाखरे परोपरी। निर्वेधपणे फुलांवरी
    जशी स्वये तरलित होती। मंद तरल गंधावरती
    तेवि जगाच्या फुलांवरी। गंध दाटले परोपरी
    अनुभवुनी हर्षित व्हावे। सुखदुःखे चुंबित गावे” [2019/10m/5b]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बालकवींना ‘सृष्टीचा गायक’ हे अभिधान कसे समर्पक ठरते ते त्यांच्या कविता ओळींच्या संदर्भाने स्पष्ट करा. [2019/15m/6b]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘एक निसर्गकवी’ म्हणून बालकवींच्या काव्याविष्काराविषयीचा परामर्श घ्या. [2018/15m/7a]

  15. ‘प्रफुल्ल निसर्गाची आनंदगीते गाणारे बालकवि मनाची उदासीन स्थितिही तेवढ्याच प्रभावीपणे व्यक्त करतात.’ सोदाहरण स्पष्ट करा. [2017/15m/7a]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘बालकवी निसर्गाकडे एक पूर्ण रूप, एक आनंदाचे रूप म्हणून पाहतात. त्यांच्या दृष्टीने निसर्गाचे जग हे निर्मत्सर, निरागस आहे.’ या विधानाची सत्यता पटवून द्या. [2016/15m/6a]

  17. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: सुंदरतेच्या मोहनांत मन अमुचेंही नाचे;
    बंधहि होतीं शिथिल, हरपतें भनहि जगताचें.
    जीव ओढतो वरवर जाया चैतन्यापाठीं;
    हाय ! सुटेना दृढ देहाची परि बसली गांठी ! [2015/10m/5c]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बालकवींच्या कवितेत रोमँटिसिझममधील कोणकोणत्या वृत्तिविशेषांचा कशा प्रकारे आविष्कार झाला आहे, ते साधार लिहा. [2015/15m/7a]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:– बालकवींनी निसर्गातील विविध घटकांना मानवी भावना कशा प्रदान केल्या आहेत, ते सोदाहरण वर्णन करा. [2014/15m/7a]

  20. पुढील पाच पद्यखण्डांची प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: मदनाची मंगलमाया। नटनाच करी हृदयांत;
    स्फुरतात कल्पनातीत। रणकार सुखाचे त्यांत.
    किति होत नाच नयनांचा। किति रंग मुखावर आलेच
    ते चित्त चोर चित्ताला। कितिदां तरि चुकवुनि गेले. [2013/10m/5c]

  21. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा: बालकवींच्या कवितेचे, काव्यानुभवाचे विश्वच वेगळे होते. त्यांनी जसा कुणाचा संप्रदाय स्वीकारला नाही, तसाच त्यांचा संप्रदायही कोणाला आत्मसात करता आला नाही, ह्या विधानाचे औचित्य साधार तपासा. [2013/20m/7a]

  22. पुढील पाच पद्यखंडाचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा. दिव्य गायनें, दिव्य शान्तता, दिव्याचे झोत,
    वसुंधरेच्या अरुण ओतितो नकळत हृदयांत !
    त्या दिव्यानें स्वर्भूमीचें ऐक्य असें केलें;
    त्या दिव्यानें मांगल्याचे पाट सुरू झाले ! [2012/12m/5d]

  23. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा. बालकवींच्या निसर्गकवितेची बहुविध गुणवैशिष्ट्ये विवरणपूर्वक लिहा. [2012/20m/7a]

  24. पुढील चार पद्यखंडाचे रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: हृदयाची गुंतागुंत कशी उकलावी?
    ही तीव्र वेदना मनामनाची ठावी.
    अंधार दाटला अपार भरला पूर,
    परि पार तयाच्या कोण मला नेणार? [2011/15m/5c]

  25. पुढीलपैकी कोणत्याही तीन पद्यखंडांचे रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: बालतरू हे चोंहिकडे
    ताल तुला देतात गडे !
    प्रेमभरें त्यांवर तूंहि
    मुक्तामणि उधळुनि देई !
    बुदबुद-लहरी-फुलवेली
    फुलव सारख्या भंवताली
    सौंदर्यें हृदयामधलीं [2010/20m/5b]

  26. बालकवी व विंदा करंदीकर किंवा नारायण सुर्वे व नामदेव ढसाळ यांनी, मराठी काव्यपरंपरेला कोणत्या नव्या गुणविशेषांची देणगी दिली ते नमूद करून त्यांनी कोणते मूळ गुणविशेष उंचावले? कसे? त्याची चर्चा करा. [2009/60m/8]

2.5] कुसुमाग्रज

31 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: कवी कुसुमाग्रजांना ‘प्रकाश पूजक कवी’ असे का म्हटले जाते, ते ‘विशाखा’ कवितासंग्रहाच्या आधारे लिहा. [2026/15m/7b]

  2. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: मरणोत्तर वाटे होइल आशापूर्ती
    स्वर्गीय मंदिरे घ्यायाला विश्रांती
    लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीती
    त्या मतीस व्याकुळ इथेच अंतिम शांती
    मातीवर चढणे एक नवा थर अंती! [2025/10m/5c]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘विशाखा’ मध्ये स्वातंत्र्याकांक्षी समुहाची भावना व्यक्त करणारी कविता प्रामुख्याने आहे, चर्चा करा. [2025/15m/7b]

  4. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: परी भव्य तें तेज पाहून पूजून
    घेऊं गळ्याशी कसे काजवे
    नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
    तुझी दूरता त्याहुनी साहवे. [2024/10m/5d]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “कुसुमाग्रजांच्या कवितेतून अपार जीवननिष्ठा सतत प्रवाहित होत असते.” ‘विशाखा’ काव्यसंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. [2024/15m/7b]

  6. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: भर मार्गात कधी ऐकला तव मंजुळ गान
    अडखळुनि थांबतो क्षणभर बेभान
    शब्दाशब्दांच्या घटांतून ओसंडे भाव
    पारिजातकाच्या फुलांचा कोमल वर्षाव ! [2023/10m/5d]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘प्रीती’ आणि ‘क्रांती’ यांचा उद्‌घोष करणाऱ्या कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ मधील कवितांचा ऊहापोह करा. [2023/20m/7c]

  8. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: प्रासाद भिडूं द्या गगनाला गर्वांत
    डोलुं द्या पताका सत्तेच्या उन्मत्त
    दौलती उठू द्या प्राशुनि दुर्बळ रक्त
    कोसळेल इमला समूळ अेकारातीं
    मातीवर चढणें अेंक नवा थर अंती! [2022/10m/5d]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘विशाखा’ मध्ये सामाजिक व राजकीय जीवनजाणिवा कशा व्यक्त झाल्या आहेत ते सोदाहरण लिहा. [2022/15m/8a]

  10. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: रण काय भयानक लोळे आग जळत!
    आदळती, वळती, आवळती क्रोधात
    जणुं जिंकायासी गगनाचे स्वामित्व
    आजाद-घनांशी झुंजे वादळ-वात! [2021/10m/5b]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘विशाखाने एक पिढी घडवली इतके ओज व तेज कुसुमाग्रजांच्या कवितेत आहे’ या विधानाची चर्चा करा. [2021/15m/7b]

  12. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “ध्येय, प्रेम, आशा यांची
    होतसे का कधी पूर्ती
    वेडयापरी पूजतो या
    आम्ही भंगणाऱ्या मूर्ती.” [2020/10m/5c]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: कुसुमाग्रजांच्या प्रेमकवितेचे स्वरूप तुम्ही अभ्यासलेल्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. [2020/20m/7c]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाच्या आधारे कुसुमाग्रजांच्या प्रतिभासामर्थ्याचे महत्त्व विशद करा. [2019/15m/7a]

  15. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा: परी भव्य ते तेज पाहून पूजून
    घेऊ गळ्याशी कसे काजवे
    नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
    तुझी दूरता त्याहुनी साहवे! [2018/10m/5c]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “स्वातंत्र्याबद्दलची कमालीची आसक्ती, पारतंत्र्याबद्दलचा कमालीचा संताप याबरोबरच अन्याय, जुलुम, विषमता यांच्याविरुद्धचा आक्रोश हा ‘विशाखा’ या संग्रहाचा मुख्य आशयप्रदेश आहे.” या विधानाची सत्यता पटवून द्या. [2018/20m/7c]

  17. पुढील पाच उताऱ्यांचे 150 शब्दांत रसग्रहणात्मक सटीक विवेचन करा. खुळा दधिची फसला देऊन
    अपुली हाडे असुरवधास्तव,
    त्या वज्राने तेव्हापासून
    मानव आहे कापित मानव [2017/10m/5c]

  18. ‘आजच्या समाजरचनेच्या अंतरंगाचे भेदक चित्रण करणारे कवि कुसुमाग्रज आशावादाचे स्फुल्लिंग चेतवणारे ही आहेत.’ विशाखा’च्या आधारे स्पष्ट करा. [2017/20m/7c]

  19. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
    रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
    सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते
    उठतिल त्या ज्वालातुन भावी क्रांतीचे नेते
    लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार [2016/10m/5d]

  20. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “स्वातंत्र्याबद्दलची कमालीची आसक्ती, याबरोबरच अन्याय, जुलूम, विषमता यांच्या विरुद्धचा आक्रोश हा ‘विशाखा’ या संग्रहाचा मुख्य आशयप्रदेश आहे.” या विधानाचा परामर्श घ्या. [2016/20m/6c]

  21. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: ध्येय, प्रेम, आशा यांची
    होतसे का कधी पूर्ती
    वेड्यापरी पूजतो या
    आम्ही भंगणाऱ्या मूर्ती ! [2015/10m/5d]

  22. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘विशाखा’ तील कवितांद्वारे आविष्कृत झालेल्या कवीच्या सामाजिक व राष्ट्रीय जाणिवांची विस्ताराने चर्चा करा. [2015/15m/7b]

  23. पुढील पाच पद्यखंडांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा:– “वा तांडव करिता सोम प्राशुनी काली
    रक्तात नाहली शिरमुंडावळ भाली
    थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या
    हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली” [2014/10m/5b]

  24. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:– केशवसुतांच्या सामाजिक आशयाच्या कवितांचा वारसा कुसुमाग्रज यांनी पुढे चालविला असे म्हणता येईल का, ते ‘विशाखा’ मधील कवितांच्या आधारे ठरवा. [2014/20m/7b]

  25. पुढील पाच पद्यखण्डांची प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: काळाच्या कवि, वालुकेवरि तुवा जी रोवली पावले
    नाही दर्शविण्यास शक्त पथ ती कोणा नसो तो तरी
    आहे आग जगातली जरि नसे संगीत स्वर्गातले
    तत्त्वांचा बडिवारही न अथवा ना गूढशी माधुरी. [2013/10m/5d]

  26. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा: ‘समिधाच सख्या या’ ह्या कवितेद्वारा कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’तील कवितांची स्वाभाविक प्रकृती निश्चित होते काय, ह्या प्रश्नाच्या आधारे सन्दर्भासह स्पष्टीकरण द्या. [2013/15m/7b]

  27. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा. ‘विशाखा’ मधील प्रेमभावनेची वेगवेगळी रूपे सप्रमाण वर्णन करून सांगा. [2012/20m/7b]

  28. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ‘विशाखा’ मधून व्यक्त झालेल्या राष्ट्रभावनांचा परामर्श घ्या. [2011/30m/7a]

  29. पुढीलपैकी कोणत्याही तीन पद्यखंडांचे रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
    कथा या खुळ्या सागराला
    “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
    किनारा तुला पामराला [2010/20m/5c]

  30. ‘विशाखा’ आणि ‘मृद्गंध’ या कवितासंग्रहांतून राष्ट्रीय स्पंदनांचे आणि सामाजिक जाणिवांचे स्वरूप कसे दिसून येते याचा परामर्श घ्या. [2010/60m/7]

  31. पुढीलपैकी कोणत्याही तीन पद्यखंडांचे रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: “समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
    कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
    जात्याच रूक्ष या, एकच त्या आकांक्षा,
    तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा !” [2009/20m/5c]

2.6] विंदा करंदीकर

22 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मृदगंध’ मधील सामाजिक आणि प्रेमानुभव व्यक्त करणाऱ्या कवितांचा परिचय करून द्या. [2026/20m/8c]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: विं. दा. करंदीकर यांची कविता प्रगाढ वैचारिकता प्रगट करते त्यासोबतच नाजूक भावसौंदर्याचाही प्रत्यय देते, हे विधान ‘मृदगंध’च्या आधारे स्पष्ट करा. [2025/20m/8c]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मृद्‌गंध’ या संग्रहातून करंदीकरांची सामाजिक जाणीव आणि इहवादी दृष्टिकोन ठाशीवपणे व्यक्त होतो. साधार पटवून द्या. [2024/20m/7c]

  4. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: हा रस्ता अटळ आहे ! अटळ घाण सारी;
    अटळ आहे शिसारी.
    एक वेळ अशी येईल, घाणीचेच खत होईल
    अन्यायाची सारीं शिते, उडतील पुन्हां;
    होतील भुतें. [2023/10m/5e]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सूक्ष्मनिरीक्षण, बुद्धिवादी दृष्टिकोण आणि विचारांची प्रखरता ही विंदा करंदीकरांच्या कवितेची वैशिष्ट्ये ‘मृदगंध’ मध्ये कशी दिसतात ते विशद करा. [2023/15m/8b]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मृद्‌गंध’ या काव्यसंग्रहाच्या आधारे विंदा करंदीकरांच्या प्रतिभेची विविधता साधार विशद करा. [2022/20m/8c]

  7. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: कधी याचितों सन्; कधी स्वप्न याची,
    कधी धांवतो काळ टाकून मागें.
    कधी वर्णतों अमृताच्या सरी अन्
    कधी मृत्युची भाबडी भीक मागें. [2021/10m/5e]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मृद्‌गंध’ या कवितासंग्रहातील प्रतिमांची विविधता व नाविन्य यांचे विवेचन करा. [2021/15m/8a]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: जाणिवेच्या विविध स्तरांवरचे भावानुभव करंदीकर यांच्या ‘मृदगंध’ या काव्यसंग्रहातून समर्थपणे कसे व्यक्त झालेले दिसतात? ते लिहा. [2020/15m/8b]

  10. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा: “अंधाराचा काळा हत्ती
    पृथ्वीपुढे झुलतो आहे
    पायांखाली काय दडे?
    नरबलीचे प्रेत सडे;
    तुझी-माझी धाव आहे
    दातापासून दाताकडे.” [2019/10m/5c]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मृद्गंध’ या कवितासंग्रहातून विंदा करंदीकर यांच्या समाजनिरीक्षणातील विविधता कशी प्रत्ययास येते, ते सोदाहरण सांगा. [2019/20m/7c]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मृदगंध’ मधील प्रतिमासृष्टीची वैशिष्ट्ये अधोरेखित करा. [2018/20m/8c]

  13. ‘मृद्गंध’ मधील प्रेमानुभव व्यक्त करणाऱ्या कवितांचा परामर्श घ्या. [2017/15m/7b]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “मृदगंध या कविता संग्रहात करंदीकरांची सामाजिक जाणीव आणि इहवादी दृष्टिकोन ठाशीवपणे व्यक्त होतो.” चर्चा करा. [2016/15m/8a]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: विंदा करंदीकर यांच्या ‘मृद्गंध’ या संग्रहामध्ये विविध अनुभवांचा व जाणिवांचा प्रभावी आविष्कार झाला आहे. विधानाची चिकित्सा करा. [2015/20m/7c]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:– दाहक प्रेमवंचनेचा खोल कडवट अनुभव करंदीकरांच्या प्रेमकवितेत कसा व्यक्त होतो, ते ‘मृद्गंध’ मधील कवितांच्या आधारे सांगा. [2014/15m/7c]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा: विंदांच्या ‘मृद्गंध’ कवितासंग्रहात गद्याच्या परखडपणासोबत निखालस शारीर अनुभवांतील रसरशीत सत्याला सुरूप देणाऱ्या भावाविष्काराचा प्रत्यय येतो अशा मताविषयीचे उदाहरणांसह विवरण करा. [2013/15m/8c]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा. ‘मृद्गंध’ मधील प्रतिमासृष्टीचे निराळेपण उदाहरणे देऊन स्पष्ट करा. [2012/20m/7c]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. विंदा करंदीकरांची कविता सतत नाविन्याचा शोध घेत राहिली, ‘मृद्गंध’ च्या आधारे स्पष्ट करा. [2011/30m/7b]

  20. पुढीलपैकी कोणत्याही तीन पद्यखंडांचे रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: मृगाच्या वादळांतून मीं ऐकले
    मातींतील महापुरुषांचे आर्त निःश्वास;
    आणि विजेच्या कडकडत्या प्रकाशांत
    पाहिले मानव पोलादी कण्यांचे
    जीवनाच्या ॲसिडांत विरघळून जातांना;
    पाहिली मानवता दोन पेडांच्या
    जुनाट जात्यानें दळीत बसलेली
    आपल्याच पोरांना आपल्याच हातांनी
    आणि गात चिलयाच्या ओव्या;
    नाहीं रे उजाडत. [2010/20m/5d]

  21. ‘विशाखा’ आणि ‘मृद्गंध’ या कवितासंग्रहांतून राष्ट्रीय स्पंदनांचे आणि सामाजिक जाणिवांचे स्वरूप कसे दिसून येते याचा परामर्श घ्या. [2010/60m/7]

  22. बालकवी व विंदा करंदीकर किंवा नारायण सुर्वे व नामदेव ढसाळ यांनी, मराठी काव्यपरंपरेला कोणत्या नव्या गुणविशेषांची देणगी दिली ते नमूद करून त्यांनी कोणते मूळ गुणविशेष उंचावले? कसे? त्याची चर्चा करा. [2009/60m/8]

2.7] नारायण सुर्वे

25 questions

  1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: देहाच्या वाती वळून, प्रज्वलित करून
    तुझ्या निरांजनात पालवून
    एका नव्या क्रांतीकडे, नव्या प्रकाशाकडे
    आमचे घोडे उधळले; तर हे देशा–
    कृतघ्नतेचे आरोप आमच्यावर करू नकोस
    तुझ्या आकाशातील आम्हीही तारे आहोत
    हे विसरू नकोस. [2026/10m/5d]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “महानगरातील समाजवास्तव हा नारायण सुर्वे यांच्या कवितेचा गाभा आहे”, हे विधान ‘जाहिरनामा’तील कवितांच्या आधारे उलगडून दाखवा. [2026/20m/7c]

  3. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: सर्व काही नाकारून माझे शब्द केव्हाच निघालेत
    अजून तुझी आवराआवर झाली का नाही?
    ह्या एकोणीस ठिगळांचा आता कशाला विचार?
    अजून तुझी फूले माळून झालीत का नाही? [2025/10m/5d]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नारायण सुर्वे यांनी सूर्ययुगाची सुरूवात करून आधुनिक मराठी कवितेला कोणती वैशिष्ट्यपूर्ण देणगी दिली? ‘जाहिरनामा’ मधील कवितांच्या आधारे स्पष्ट करा. [2025/20m/7c]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘जाहीरनामा’ या काव्यसंग्रहातून नारायण सुर्वे यांचा मानवतावादी दृष्टिकोन कसा अभिव्यक्त होतो? चर्चा करा. [2024/15m/8a]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: कामगारांच्या जीवनानुभवांची यथार्थ आणि कलात्मक संघर्ष चित्रे नारायण सुर्वे यांनी कवितेतून कोणत्याप्रकारे रेखाटलेली आहेत, ते ‘जाहिरनामा’ मधील कवितांच्या आधाराने सांगा. [2023/15m/8a]

  7. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: या चवताळलेल्या भूकिस्तांच्या झुंडी
    कुणीकडून आल्या कुठे निघाल्या?
    या शहराच्या चौकाचौकात उभारलेले
    क्रांतिकारकांचे पुतळे उखडून कुठे गेल्या? [2022/10m/5e]

  8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘नारायण सुर्वे यांच्या कवितांमधून प्रकटलेले आशय-विचारविश्व वास्तवाभिमुख आहे’ या विधानातील सत्यासत्यता ‘जाहीरनामा’च्या आधारे स्पष्ट करा. [2022/15m/6b]

  9. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली
    हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
    कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. [2021/10m/5c]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: जगणे कठीण असल्याचा आक्रोश आणि नरकतुल्य जीवनात बेचैन झालेल्या मनाची व्यथा नारायण सुर्व्यांच्या कवितेत कशी उमटली आहे याचे विवेचन करा. [2021/15m/6a]

  11. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मढैकरांनंतर नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला जिवंत आणि वास्तवाभिमुख बनविले ‘जाहीरनामा’ या काव्यसंग्रहाच्या आधारे विशद करा. [2020/15m/8a]

  12. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा: “आणि दोस्तहो!
    मी पाहतो आहे
    एक क्षुब्ध नवागत गतीचे टोक धरून
    लिहितो आहे;
    हे शब्द हटवा… हे पुतळे… स्थितिस्थापक.
    हवा आहे मनासारखा नवा जाहिरनामा म्हणून.
    नवा जाहिरनामा म्हणून.” [2019/10m/5d]

  13. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘जाहिरनामा’ या काव्यसंग्रहाच्या आधारे, नारायण सुर्वे यांनी नाट्यगीत या काव्यप्रकाराला नवे परिमाण कसे दिले, त्याची चर्चा करा. [2019/20m/8c]

  14. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा: जाड परोठ्यान झालो म्हणा थंड
    आता कैचे बंड इहलोकी…
    अनंताचे म्हणा फळो आले ज्ञान
    परी रोटीवीण व्यर्थ बाप्पा
    संपलाच नाही भाकरीचा मार्ग
    ग्रंथातले स्वर्ग कशापायी? [2018/10m/5d]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “ ‘जाहीरनामा संग्रहातील’ कविता श्रमिकांच्या जीवनानुभवांचे विविध पदर उलगडून दाखवते.” साधार चर्चा करा. [2018/15m/8a]

  16. ‘कवितेत मी माझ्याशीच संवाद करतो’ या नारायण सुर्वे यांच्या विधानाच्या आधारे ‘जाहीरनामा’ मधील कवितांचे अंतरंग उलगडून दाखवा. [2017/15m/8a]

  17. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “‘जाहीरनामा’ म्हणजे विसाव्या शतकातील माणसांना उद्देशून कवीने केलेले आवाहन आहे.” या विधानाची चिकित्सा करा. [2016/15m/6b]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नारायण सुर्वे यांच्या ‘जाहीरनामा’ संग्रहामधील कवितेचे वेगळेपण वैयक्तिकता तसेच वर्गरेषा यांत सामावले आहे अशी भूमिका घेऊन विस्ताराने चर्चा करा. [2015/15m/8a]

  19. पुढील पाच पद्यखंडांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा:– “भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली
    हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
    कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले” [2014/10m/5a]

  20. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:– ‘जाहीरनामा’ या कवितासंग्रहातील कवितांमधून प्रकट झालेले दुःख आणि दारिद्र्य यांचे स्वरूप वर्णन करा. [2014/15m/8a]

  21. पुढील पाच पद्यखण्डांची प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: “अरे, कविता-बिविता लिहितोस की काय?
    छान, छान,
    मलासुद्धा गटे आवडायचा.” [2013/10m/5e]

  22. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा: ‘जाहीरनामा’तील कविता म्हणजे व्यक्तिगत सुखदुःखाचे कढ, उमाळे रुंदावून ते समष्टीशी युक्त होताना विश्वात्मकता साधणारी भावात्मकता होय, हे मत कितपत सयुक्तिक वाटते ते सन्दर्भासह स्पष्ट करा. [2013/15m/7c]

  23. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा. ‘जाहीरनामा’ मधील कविता ही समग्र मानवजातीला उद्देशून लिहिली आहे, या विधानाची यथार्थता समजावून सांगा. [2012/20m/8a]

  24. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. नारायण सुर्वे यांनी ‘जाहिरनामा’ मधून रेखाटलेले जीवनविश्व वेगळ्या प्रकारचे कसे आहे, ते सांगा. [2011/30m/8a]

  25. आशय आणि अभिव्यक्ती या दृष्टीने १९६० नंतरच्या मराठी कवितेतील बदलाचे चित्र ‘संध्याकाळच्या कविता’, ‘जाहीरनामा’ आणि ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या कवितासंग्रहांत कसे आढळते याविषयी सविस्तर विवेचन करा. [2010/60m/8]

2.8] ग्रेस

23 questions

  1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: तुझा घोडा तूं मोकळा सोडलास
    शिशिराच्या निर्विघ्न कुरणांत…
    तो मध्येंच दिपून पाहतो, एका नसलेल्या ध्रुवाच्या
    दिशेंत झिजणाऱ्या तुझ्या देहास…
    तुला वाटतात तितके सोपे नसतात तुझे अश्रु;
    पाण्याच्या सलीलसंभ्रमांत हलतात जखमी
    ख्रिस्ताच्या घंटा रात्रंदिवस… [2026/10m/5e]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मुक्तछंद हे छंदोबद्धच काव्य असते’, हे विधान कवी ग्रेस यांच्या ‘संध्याकाळच्या कविता’ या काव्यसंग्रहातून कसे प्रत्ययास येते ते लिहा. [2026/15m/8a]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘नाविन्य आणि लावण्य यांच्या सुंदर मिलाफमुळेच कवी ग्रेस यांची कविता रसिकांना आनंद देते’ या विधानाची यथार्थता ‘संध्याकाळच्या कविता’ संग्रहा आधारे पटवा. [2025/15m/8a]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: कवी ग्रेस यांच्या काव्याची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. [2024/15m/8b]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कवितेमध्ये आढळणाऱ्या गूढ प्रतिमांचा अन्वर्यार्थ उलगडून दाखवा. [2023/15m/7b]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ग्रेस यांच्या ‘संध्याकाळच्या कवितां’ मधील प्रतिभासृष्टीचे स्वरूप साधार उलगडून दाखवा. [2022/20m/7c]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘संध्याकाळच्या कविता’ मधील अनुभवांचे स्वरुप स्पष्ट करुन त्या कविता दुर्बोध अर्थदृष्ट्या संदिग्ध का वाटतात ते लिहा. [2021/15m/8b]

  8. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “पहाड ईथले मुके दिवस आंधळा की जसा
    अभंग तिमिरांतला तडत चालला आरसा
    तसा सहज नाचतों कधि न बांधिली पैंजणे
    जशा धुळिंतल्या दिशा भुलुन गाय जी हंबरे…” [2020/10m/5d]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘सायंकालीन गूढ भावार्त मनःस्थितीचे प्रकटीकरण कवी ग्रेस यांच्या कवितांतून उत्कटपणे जाणवत रहाते’ सोदाहरण स्पष्ट करा. [2020/15m/7b]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘संध्याकाळच्या कविता’ या काव्यसंग्रहात ग्रेस यांनी विविध वृत्तांचा आणि मुक्तछंदाचा वापर करून आपले रचनाकौशल्यावरील प्रभुत्व कसे प्रदर्शित केले आहे, त्याची सोदाहरण चिकित्सा करा. [2019/15m/8a]

  11. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा: नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे,
    ब्रह्मांडाची दारे बंद झाली
    माझ्या आसवांना फुटे हिमगंध,
    मागे पुढे बंध पापण्यांचे [2018/10m/5e]

  12. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘संध्याकाळच्या कविता’ या संग्रहाच्या आधारे ग्रेस यांच्या प्रतिमासृष्टीवर बेतलेले सार्थक टिपण लिहा. [2018/15m/7b]

  13. शब्दकला, प्रतिमा आणि रचनाबंध यांच्या आधारे ‘संध्याकाळच्या कविता’ मधील ग्रेस यांच्या कवितेचे सौंदर्य उलगडून दाखवा. [2017/15m/8b]

  14. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: रंगांच्या रसनेत सूर्य बुडला अंधारले सागरी
    बेटांचे जळबिंब फक्त हलते माझ्याच प्राणावरी
    घोड्यांचे पथ दक्षिणेत मिटले गेले सखेसोबती
    एकाकी नभ प्राक्तनात शिरता रक्तात येते भिती. [2016/10m/5c]

  15. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “भारतीय संस्कृतीतील संचित आणि पाश्चात्य वाङ्मयाचे संस्कार यांमुळे ग्रेस यांची कविता अनोख्या संवेदनविश्वातून फिरत असल्याचे जाणवत राहते.” या विधानाचा परामर्श घ्या. [2016/15m/8b]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “ग्रेस यांची कविता केवळ त्यांच्या आंतरिक वास्तवातूनच आकार धारण करते, तिचा समकालीन वास्तवाशी कोणताही संबंध नाही.” या विधानाची साधार चिकित्सा करा. [2015/15m/8b]

  17. पुढील पाच पद्यखंडांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा:– “नको मोजू माझ्या
    मुक्तीची अंतरे;
    ब्रह्मांडाची दारे
    बंद झाली.” [2014/10m/5c]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:– ग्रेस यांच्या ‘संध्याकाळच्या कविता’ मधील प्रतिमासृष्टीचे वेगळेपण स्पष्ट करा. [2014/20m/8b]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा: माणिक गोडघाटे ‘ग्रेस’ यांच्या ‘संध्याकाळच्या कवितां’तील ‘स्मरणशिल्प’ या चौथ्या काव्यगुच्छात ‘इन्ग्रिड बर्गमन्’ या शीर्षकाची एक कविता म्हणजे ग्रेस यांनी सर्जनशील पूर्वसुरींशी साधलेला संवाद आहे, ह्या विधानाची यथार्थता साधार अधोरेखित करा. [2013/20m/8a]

  20. पुढील पाच पद्यखंडाचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा. त्या दाट लांब केसांचा
    वाऱ्यावर उडतो साज
    दुःखांत अंबरें झुलती
    कीं अंग झाकते लाज…. [2012/12m/5e]

  21. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा. ‘संध्याकाळच्या कवितां’चे सौंदर्य कोणकोणत्या गुणविशेषांत सामावले आहे, ते विशद करा. [2012/20m/8b]

  22. पुढील चार पद्यखंडाचे रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: संदिग्ध घरांच्या ओळी
    आकाश ढवळतो वारा
    माझ्याच किना-यावरती
    लाटांचा आज पहारा. [2011/15m/5d]

  23. आशय आणि अभिव्यक्ती या दृष्टीने १९६० नंतरच्या मराठी कवितेतील बदलाचे चित्र ‘संध्याकाळच्या कविता’, ‘जाहीरनामा’ आणि ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या कवितासंग्रहांत कसे आढळते याविषयी सविस्तर विवेचन करा. [2010/60m/8]

2.9] नामदेव ढसाळ

21 questions

  1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या संग्रहातील कविता नामदेव ढसाळ यांची समाजनिष्ठा आणि कवीची अंतर्मुखता याविषयीचे चिंतन व्यक्त करते, कसे ते सांगा. [2026/15m/8b]

  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या संग्रहातील कविता दलितांच्या जाणिवा आणि दुःख यांना एक नवा आकार देते, कसे ते सांगा. [2025/15m/8b]

  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘या सत्तेत जीव रमत नाही’ मधील कविता नामदेव ढसाळांच्या काव्याला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या कविता आहेत. साधार पटवून द्या. [2024/20m/8c]

  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या कवितासंग्रहाच्या शीर्षकाची यथार्थता ढसाळ यांच्या कवितांच्या आधारे स्पष्ट करा. [2023/20m/8c]

  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेव ढसाळांच्या कवितांमधून आविष्कृत झालेला अनुभव व्यामिश्र स्वरूपाचा आहे हे मत ‘या सत्तेत जीव रमत नाही’ मधील कवितांच्या आधारे स्पष्ट करा. [2022/15m/8b]

  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेव ढसाळांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील संघर्ष ‘या सत्तेत जीव रमत नाही’ मधून कसा चितारला आहे ते लिहा. [2021/20m/7c]

  7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नामदेव ढसाळांची कविता एका विशिष्ट समाजाचेच नव्हे तर संपूर्ण शोषित आणि पीडित समाजाच्या वेदनांचे चित्रण करते ‘हे विधान या सत्तेत जीव रमत नाही’ च्या आधारे स्पष्ट करा. [2020/20m/8c]

  8. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादकपूर्वक विवेचन करा: “हा एक हृदय-कापणीचा हंगाम
    समाप्तीच्या अगोदरची ही ऑक्टोबरची हीट
    मऊशार लुसलुशीत काळोखात अश्रुचं चकाकणं
    नियतीच्या आसाभोवती फिरणारा घोडा
    मी ठोकून बसलोय मांड त्यावर
    चल मेरे घोडे टिक् टिक् टिक्
    मला हे सारंच ढकलायला हवं पुढं…” [2019/10m/5e]

  9. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या काव्यसंग्रहात नामदेव ढसाळ यांच्या काव्यानुभवाचा विकास सामाजिकतेकडून आध्यात्मिकतेच्या दिशेने झालेला आहे काय? या विषयी साधक बाधक चर्चा करा. [2019/15m/7b]

  10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “सामाजिकतेच्या पलिकडे जाऊन मानवी अस्तित्वाचा शोध [?] घेण्याचा प्रयत्न नामदेव ढसाळ यांची कविता करते.” ‘या सत्तेत जीव रमत नाही’च्या आधारे हे विधान स्पष्ट करा. [2018/15m/8b]

  11. पुढील पाच उताऱ्यांचे 150 शब्दांत रसग्रहणात्मक सटीक विवेचन करा. ज्यांना जन्मभर दुःख, दैन्य, दारिद्र्यच मिळाले असेल
    त्यांनी तपशीलासह सर्वच नाकारू नये, तर काय करावे?
    आश्वासित शब्दांवर आता माझाही विश्वास उरलेला नाही
    प्रत्येक संदर्भातून दुर्गंधीच येत आहे; तर काय करावे? [2017/10m/5d]

  12. ‘ढसाळ यांच्या कवितेतील विद्रोहाचा तीव्र स्वर’ या ‘सत्तेत जीव रमत नाही’ या ‘संग्रहात अधिक अंतर्मुख आणि अस्तित्त्वलक्ष्यी झालेला आहे.’ विवेचन करा. [2017/20m/8c]

  13. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: या शहरावर, संस्कृतीवर, फुलांवर कसा उरावा विश्वास
    भडाभडा चार तांबे ओतून मोकळे होऊ नये, तर काय करावे?
    म्हणालोच, ही पृथ्वीः हिला केवळ जन्माला घालणेच ठाऊक आहे.
    आपणच आपणाला सदैव सदा घालू नये, तर काय करावे? [2016/10m/5a]

  14. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “ढसाळांच्या कवितेत समूहनिष्ठेबरोबरच वैयक्तिक भावजीवन व्यक्त करणारा आत्मनिष्ठ सूरही व्यक्त होतो.” ‘या सत्तेत जीव रमत नाही’च्या आधारे स्पष्ट करा. [2016/20m/8c]

  15. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा: जात, वर्ण, धर्माचे नद्या-डोंगर ओलांडून ज्ञानोबा तुम्हाला
    अमृतानुभवाकडे जाता आले नाही
    ताटी लावून जसे पहिल्यांदा रुसून बसलात ते रुसणे
    कायमच राहिले. [2015/10m/5e]

  16. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या संग्रहामध्ये कवीचा भर समूहलक्ष्यी जाणिवांपेक्षा अस्तित्वलक्ष्यी जाणिवांवर अधिक आहे, हे मत तुम्हाला पटते का? या प्रश्नाशी संबंधित सकारण उत्तर लिहा. [2015/20m/8c]

  17. पुढील पाच पद्यखंडांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा:– “दिवसेंदिवस माण्सं अशी छोटी छोटी होत जातायत
    चुका आपण करतो
    दोष सैतानाला देतो” [2014/10m/5d]

  18. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:– ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या संग्रहातील कवितांचे आकृतिबंध विविध पातळ्यांची सरमिसळ करून कसे बनलेले आहेत, ते विशद करा. [2014/15m/8c]

  19. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा: नामदेव ढसाळांच्या ‘या सत्तेत जीव रमत नाही’ मध्ये वाचकाला कवीच्या नकारात्मक भूमिकेचा प्रत्यय येतो असे म्हणता येते का? याविषयीची संदर्भासह चर्चा करा. [2013/15m/8b]

  20. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 250 शब्दांत लिहा. ‘या सत्तेत जीव रमत नाही’ मधील सामाजिकतेचे स्वरूप प्रगल्भ आहे असे तुम्हाला वाटते का? चर्चा करा. [2012/20m/8c]

  21. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. सामाजिकतेच्या पलिकडे जाऊन मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न नामदेव ढसाळांची कविता करते – ‘या सत्तेत जीव रमत नाही’ च्या आधाराने स्पष्ट करा. [2011/30m/8b]

Cover of the UPSC Mains Topic-wise and Year-wise PYQs book (2013–2026)

From the Optional Province team

Strengthen your GS papers

Our UPSC Mains Topic-wise & Year-wise PYQ Book (2013–2026) maps every GS question to the syllabus, so you know what UPSC asks and how often. Now available as a hard copy and an eBook.

Buy Hard Copy on AmazonBuy eBook (PDF)

Download a free sample

Spotted an error? Tell us.

We classify every PYQ with care, but mistakes can slip in. If a question is in the wrong topic, has a typo, the wrong year, or is missing, let us know. We review every report and update the page.

Report an Error

« Previous: विभाग अ: गद्य · Next: Other questions »

Back to: Marathi Literature Optional PYQs – Topic-wise

Last updated: 2 November 2026