Every question from the Marathi Literature Optional papers of UPSC Mains 2026, placed in its syllabus unit and checked against all questions asked from 2013 to 2025. See what was familiar, what came back and what was new.
Other years:
What stood out in 2026
- Fewer marks than usual: साहित्यसमीक्षा (35 marks, against an average of 46).
- Every question came from a topic UPSC had asked recently.
Which units got the marks in 2026
Marks asked from each unit in 2026 (dark bar) against its average for 2013–2025 (grey bar).
Paper I
| Unit | 2026 | Average 2013–25 |
|---|---|---|
| भाषा आणि लोकसाहित्य | 200 | 197 |
| मराठी साहित्याचा इतिहास | 165 | 156 |
| साहित्यसमीक्षा | 35 | 46 |
Paper II
| Unit | 2026 | Average 2013–25 |
|---|---|---|
| विभाग अ: गद्य | 200 | 200 |
| विभाग ब: कविता | 200 | 200 |
A question that fits two units is split equally between them.
Paper I
Q1a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: विभक्ती म्हणजे काय ते सांगून विभक्ती प्रत्ययांची चर्चा करा. (10 marks)
Q1b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठी प्रदेशानुसार बदलत्या प्रमाणभाषेचे स्वरूप स्पष्ट करा. (10 marks)
Q1c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: प्रयोग म्हणजे काय? भावे प्रयोगाचे सोदाहरण विवेचन करा. (10 marks)
Q1d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: लोकनाट्याची वैशिष्ट्ये सांगून ‘दशावतार’ आणि ‘खडी गंमत’ या लोकनाट्य प्रकारांचा परिचय करून द्या. (10 marks)
Q1e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘मराठी भाषेचे अस्सल स्वरूप यादवकाळात पाहावयास मिळते.’ या विधानाची सोदाहरण चर्चा करा. (10 marks)
Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषेच्या विविध व्याख्या सांगून भाषिक संप्रेषणाचे स्वरूप उलगडून दाखवा. (20 marks)
Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बोली अभ्यासाचे महत्त्व विशद करून अहिराणी बोलीचे स्वरूप-विशेष स्पष्ट करा. (15 marks)
Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकगीतांची संकल्पना स्पष्ट करून त्यातील वाङ्मयीन गुण-वैशिष्ट्यांचा परिचय करून द्या. (15 marks)
Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषेचे स्वरूप स्पष्ट करून भाषेची विविध लक्षणे सांगा. (20 marks)
Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शब्दांच्या जाती किती व कोणत्या ते सांगून त्यांची सोदाहरण चर्चा करा. (15 marks)
Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोककथा अभ्यासाच्या विविध संप्रदायांचा परिचय करून द्या. (15 marks)
Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: सतराव्या शतकातील मराठी भाषेंचे स्वरूप सोदाहरण स्पष्ट करा. (20 marks)
Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बोली निर्मितीची कारणे सांगून वऱ्हाडी ही मराठीची बोली की स्वतंत्र भाषा, ते सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)
Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘व्यावहारिक भाषा’ आणि ‘साहित्याची भाषा’ यांतील फरक विशद करा. (15 marks)
Q5a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘धवळे’ म्हणजे काय ते सांगून महदंबेच्या धवळयांचे स्वरूप स्पष्ट करा. (10 marks)
Q5b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: संत तुकारामांच्या अभंगांची अवतरणक्षमता सिद्ध करा. (10 marks)
Q5c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: आस्वादक समीक्षेचे स्वरूप स्पष्ट करा. (10 marks)
Q5d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: ‘पोवाडा’ या रचनाप्रकाराचा परिचय करून द्या. (10 marks)
Q5e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: दलित आत्मकथनांचे निराळेपण विशद करा. (10 marks)
Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: महानुभाव संप्रदायातील चरित्रग्रंथांचा मागोवा घ्या. (20 marks)
Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: संत एकनाथांच्या भारूडातील रूपकात्मकता स्पष्ट करा. (15 marks)
Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: पंडिती काव्य परंपरेतील रघुनाथ पंडिताचे स्थान अधोरेखित करा. (15 marks)
Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लावणी या रचना प्रकाराची संकल्पना स्पष्ट करून लावणीच्या विविध अंगांचा परिचय करून द्या. (20 marks)
Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्य समीक्षा ही साहित्याच्या आकलनास कशी प्रेरक ठरते, ते सविस्तर वर्णन करा. (15 marks)
Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बखर म्हणजे काय ते सांगून सभासदाच्या बखरीची वैशिष्ट्ये सांगा. (15 marks)
Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: स्त्रीवादाची संकल्पना स्पष्ट करून स्त्रीवादी साहित्य समीक्षेचा सांगोपांग परिचय करून द्या. (20 marks)
Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: १८५० ते १९९० या कालखंडातील मराठी साहित्य क्षेत्रात झालेल्या बदलांचा ऊहापोह करा. (15 marks)
Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ग्रामीण साहित्य निर्मितीच्या प्रेरणा सांगून ग्रामीण साहित्यातील बदलते समाजवास्तव विशद करा. (15 marks)
Paper II
Q1a. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: माहादाइ-वोवीया-गायेन-श्रवणिं रूपैची सीध (द्ध) वाणि म्हणणें: ॥: एकु दीसु महादाइसीं काइसेया प्रकरणावरूनि वोविया गाइलीया: तें नेणीजें: ।: महादाइसीं म्हणितलें: नागदेवाचेया खांदावरि करु: राजा चक्रधरू: बीजें करी: ॥१॥ सोनेसळा सेला: नेसला मालगठीं: म्हाइया आला भेटी: प्रभूचीये: ॥२॥ (10 marks)
Q1b. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: तशांत पर्जन्याची अनावृष्टि झाल्यावरून पडलेल्या दुष्काळांत चारापाण्यावांचून लक्षावधि बैलांचा सरसकटीनें खप होऊन त्यांचें वाटोळें झालें. (10 marks)
Q1c. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “स्वतःच्या प्रयत्नाने माझे लग्न जुळविण्याची खटपट फारशी करता आली नाही. तशी खटपट करावयाची म्हणजे चोरून तरुणांच्या भेटी घेणे इत्यादी क्रिया कराव्या लागल्या असत्या, पण त्या शक्य झाल्या नाहीत. आमचे बाबा जरी सुधारक म्हणवीत होते तरी स्त्री-पुरुषांचा मोकळा व्यवहार असावा याच्या ते विरुद्धच होते.” (10 marks)
Q1d. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: निंदणं-खुरपण्याच्या मोसमात लई करून गडी व काही बाया मिळून खुरपण्याचे गुत्ते घेतासत व माणसं व बाया बरोबरीनेच निंदीत असूनही माणसाला बाईच्या डबल दाणे देतासत व बायाला माणसाच्या निम्मे दाणे देतासत. (10 marks)
Q1e. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “पुरुष बहुधा मट्ठ असतातच, पण आता इतक्या बाया पाहून मला तर वाटायला लागलंय की त्यांच्याशी संसार करायला मट्ठ पुरुषच हवेत!” (10 marks)
Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘स्मृतिस्थळ’ या ग्रंथाच्या आधारे महानुभाव संप्रदायाच्या तत्त्वज्ञान आणि आचारधर्माची कोणती वैशिष्ट्ये अधोरेखित होतात, ते स्पष्ट करा. (15 marks)
Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथातून महात्मा फुले यांचे नवसमाज निर्मितीचे विचारसूत्र कसे प्रकट झाले आहे, ते सोदाहरण लिहा. (15 marks)
Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “समाजप्रबोधनाचे कार्य यशस्वीपणे पार पाडणाऱ्या ‘ब्राह्मणकन्या’ या कादंबरीचा आकृतिबंध मनावर पकड घेणारा आहे.” या विधानाची विस्तृत चर्चा करा. (20 marks)
Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकाच्या भाषिक आणि अभाषिक घटकांची सोदाहरण चर्चा करा. (15 marks)
Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘शिळान’ कथासंग्रहात कृषिसंस्कृतीवर आधारित मानवी जीवनाचे प्रतिबिंब कसे उमटले आहे, ते स्पष्ट करा. (15 marks)
Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘बाबुराव बागूल’ यांच्या ‘जेव्हा मी जात चोरली होती!’ या कथासंग्रहातून वेदना, विद्रोह आणि नकार यांचे दर्शन कसे घडते, ते स्पष्ट करा. (20 marks)
Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या ‘जन हे वोळतु जेथे’ या कादंबरीतून ‘मानुषता’ या संकल्पनेचे प्रगटीकरण प्रत्ययकारीरित्या झाले आहे”, कसे ते सोदाहरण लिहा. (15 marks)
Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “प्र. ई. सोनकांबळे यांच्या ‘आठवणींचे पक्षी’ या आत्मकथनाचे लेखन म्हणजे बाल व युवा अवस्थेतील अनुभवजन्य जाणिवांचे चित्रण आहे”, याची चर्चा करा. (15 marks)
Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “गौरी देशपांडे यांच्या ‘एकेक पान गळावया’ मध्ये स्त्री-पुरुष संघर्षाचे प्रभावी दर्शन घडते.” या विधानाचा परामर्श घ्या. (20 marks)
Q5a. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: नदीचिया माशा घातलें माजवण। तैसें जनवन कलवलें॥
दाही दिशा धुंद उदयास्तावीण। तैसेंची गगन कालवलें॥
जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी। पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा। पादपद्मीं ठेवा निरंतर॥ (10 marks)
Q5b. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: म्हातारी उडतां न येच तिजला माता मदीया तसी।
माता काय वदों; नवप्रसव ‘ते’ सातां दिसांची असी॥
त्राता त्या उभयांस मी मज विधी घातास योजीतसे।
हातामाजि नृपाचिया गवसलों आतां करावें कसें॥ (10 marks)
Q5c. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: आम्हि मुशाफर लोक प्रीत करूं पाहतों साजणी।
दीपकळीचा रंग पाहुनी पतंग झुरतो मनीं॥ ध्रु.॥ (10 marks)
Q5d. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: देहाच्या वाती वळून, प्रज्वलित करून
तुझ्या निरांजनात पालवून
एका नव्या क्रांतीकडे, नव्या प्रकाशाकडे
आमचे घोडे उधळले; तर हे देशा–
कृतघ्नतेचे आरोप आमच्यावर करू नकोस
तुझ्या आकाशातील आम्हीही तारे आहोत
हे विसरू नकोस. (10 marks)
Q5e. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: तुझा घोडा तूं मोकळा सोडलास
शिशिराच्या निर्विघ्न कुरणांत…
तो मध्येंच दिपून पाहतो, एका नसलेल्या ध्रुवाच्या
दिशेंत झिजणाऱ्या तुझ्या देहास…
तुला वाटतात तितके सोपे नसतात तुझे अश्रु;
पाण्याच्या सलीलसंभ्रमांत हलतात जखमी
ख्रिस्ताच्या घंटा रात्रंदिवस… (10 marks)
Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “बुद्धी आणि भावना यांचा सुरेख संगम नामदेवांच्या अभंगवाणीत अनुभवास येतो”, या विधानाचे विश्लेषण करा. (15 marks)
Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “शृंगार रस आणि वीररस ही शाहिरी कवितेची बलस्थाने होत”, कसे ते ‘पैंजण’च्या आधारे स्पष्ट करा. (15 marks)
Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘आख्यानकाव्या’ची गुणवैशिष्ट्ये सांगून ‘दमयंती-स्वयंवरा’त ती कशी दिसून येतात, ते विशद करा. (20 marks)
Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बालकवींच्या काव्याच्या भाषाशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)
Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: कवी कुसुमाग्रजांना ‘प्रकाश पूजक कवी’ असे का म्हटले जाते, ते ‘विशाखा’ कवितासंग्रहाच्या आधारे लिहा. (15 marks)
Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “महानगरातील समाजवास्तव हा नारायण सुर्वे यांच्या कवितेचा गाभा आहे”, हे विधान ‘जाहिरनामा’तील कवितांच्या आधारे उलगडून दाखवा. (20 marks)
Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मुक्तछंद हे छंदोबद्धच काव्य असते’, हे विधान कवी ग्रेस यांच्या ‘संध्याकाळच्या कविता’ या काव्यसंग्रहातून कसे प्रत्ययास येते ते लिहा. (15 marks)
Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या संग्रहातील कविता नामदेव ढसाळ यांची समाजनिष्ठा आणि कवीची अंतर्मुखता याविषयीचे चिंतन व्यक्त करते, कसे ते सांगा. (15 marks)
Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मृदगंध’ मधील सामाजिक आणि प्रेमानुभव व्यक्त करणाऱ्या कवितांचा परिचय करून द्या. (20 marks)
Spotted something wrong?
If a question is in the wrong unit or a match looks wrong, please report an error.
Related: Overall Marathi Literature PYQ analysis · Year-wise question papers · Topic-wise PYQs

