Every question from the Marathi Literature Optional papers of UPSC Mains 2024, placed in its syllabus unit and checked against all questions asked from 2013 to 2023. See what was familiar, what came back and what was new.
Other years:
What stood out in 2024
- More marks than usual: मराठी साहित्याचा इतिहास (175 marks, against an average of 156).
- Fewer marks than usual: साहित्यसमीक्षा (25 marks, against an average of 46).
- 6 questions were close repeats of an earlier paper: Q2c (Paper II), first seen in 2016; Q3b (Paper I), first seen in 2017; Q4b (Paper I), first seen in 2023; Q5b (Paper II), first seen in 2018; Q5d (Paper II), first seen in 2018; Q7c (Paper II), first seen in 2016.
- Every question came from a topic UPSC had asked recently.
Which units got the marks in 2024
Marks asked from each unit in 2024 (dark bar) against its average for 2013–2023 (grey bar).
Paper I
| Unit | 2024 | Average 2013–23 |
|---|---|---|
| भाषा आणि लोकसाहित्य | 200 | 196 |
| मराठी साहित्याचा इतिहास | 175 | 156 |
| साहित्यसमीक्षा | 25 | 46 |
Paper II
| Unit | 2024 | Average 2013–23 |
|---|---|---|
| विभाग अ: गद्य | 200 | 200 |
| विभाग ब: कविता | 200 | 200 |
A question that fits two units is split equally between them.
Paper I
Q1a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: बोली भूगोल संकल्पना स्पष्ट करून अहिराणी बोलीचे वेगळेपण नोंदवा. (10 marks)
Q1b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: भाषा व्यवस्था आणि भाषा व्यवहार या दोन भाषिक स्तराचे विवेचन करा. (10 marks)
Q1c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठीतील विभक्तीविचार स्पष्ट करून द्वितीया आणि चतुर्थी विभक्तीचे साम्यभेद लिहा. (10 marks)
Q1d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: मराठी लोककथांमधून आदिबंध आणि कल्पनाबंध कसे आविष्कृत होतात, हे सोदाहरण लिहा. (10 marks)
Q1e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: नोम चॉम्स्की यांची भाषिक क्षमता (competence) संकल्पना स्पष्ट करा. (10 marks)
Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्या सहसंबंधाची चर्चा करा. (20 marks)
Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठीतील प्रयोगविचार सांगून कर्मणी प्रयोगाचे उपप्रकारासह सोदाहरण विवेचन करा. (15 marks)
Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: मराठी लोकगीत परंपरा प्रकार-भेदांसह विशद करा. (15 marks)
Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लोकनाट्याचे स्वरूप सांगून ‘तमाशा’ सादरीकरणाचे वेगळेपण सांगा. (20 marks)
Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: भाषेचे स्वरूप स्पष्ट करून भाषेचे कार्य लिहा. (15 marks)
Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: विशेषण आणि क्रियाविशेषण यातील फरक सांगून क्रियाविशेषणाच्या प्रकाराचे विवेचन करा. (15 marks)
Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: धातू म्हणजे काय हे सांगून क्रियापदाचे प्रकार स्पष्ट करा. (20 marks)
Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रमाणभाषेपेक्षा वऱ्हाडी बोली कशी वेगळी ठरते, सोदाहरण लिहा. (15 marks)
Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्यभाषेच्या ठळक विशेषांची चर्चा करा. (15 marks)
Q5a. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: संत तुकारामांच्या अभंगातील अवतरण क्षमता (प्रेरणादायी सुविचार) सोदाहरण लिहा. (10 marks)
Q5b. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: पंडिती कवितेचे वाङ्मयीन विशेष व मर्यादा लिहा. (10 marks)
Q5c. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: बखर वाङ्मयाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये लिहा. (10 marks)
Q5d. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: साहित्यातील वास्तववादाचे विशेष व मर्यादा स्पष्ट करा. (10 marks)
Q5e. पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे एकशेपन्नास (150) शब्दांत लिहा: आदिबंधात्मक समीक्षेची संकल्पना स्पष्ट करा. (10 marks)
Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: महानुभाव साहित्याने मराठी भाषा व साहित्याला दिलेल्या योगदानाची चर्चा करा. (20 marks)
Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: विजय तेंदुलकर यांच्या नाट्यलेखनाचे वेगळेपण सोदाहरण लिहा. (15 marks)
Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ह.ना. आपटे यांच्या कादंबरीचे विशेष साधार विवेचन करा. (15 marks)
Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यातील आधुनिकतेचे स्वरूप उलगडून सांगा. (20 marks)
Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साहित्य समीक्षेचे स्वरूप सांगून वाङ्मय व्यवहारातील समीक्षेची आवश्यकता अधोरेखित करा. (15 marks)
Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी कवितेचे प्रकार सांगून पोवाड्याचे वेगळेपण सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)
Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: साठोत्तरी साहित्य प्रवाहांच्या निर्मितीच्या कारणांची चर्चा करा. (20 marks)
Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘अर्वाचीन मराठी काव्याच्या इतिहासात रविकिरण मंडळाची कामगिरी मोलाची राहिली आहे’ या विधानाची साधक-बाधक चर्चा करा. (15 marks)
Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: लघुकथेचे विशेष सांगून दिवाकर कृष्ण यांच्या लघुकथेतील योगदानाचे विवेचन करा. (15 marks)
Paper II
Q1a. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: परसरामबासीं धाकुटें आचारस्थळ आणि वीचारस्थळ करणें: केशोबासीं रत्नमाळास्तोत्र करीतां। चांदह सते नीवडिलीं होती: तथांतु आणिक कांहीं प्रश्ना (म) बासी नीवडुनी घातलीः मग प्रश्ना (म) बासी गोपाळ बासाचेनी संवादेंः अन्वयो लाउनी धाकुटें आचारस्थळ आणि वीचारस्थळें केलेंः (10 marks)
Q1b. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: “स्वतःस मात्र सुख होण्याकरिता एकंदर सर्व मानवी प्राण्यास कायिक व मानसिक पिडा दिली नाही, म्हणजे त्यासच पुण्य म्हणावे.” (10 marks)
Q1c. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: माझा कोठलाही खिसा तुम्ही तपासून पहा! त्यात तुम्हाला वाळलेली गुलाबाची फुलं, जाईच्या सुकलेल्या वेण्या, चुरगळलेले हातरुमाल, बांगड्यांचे तुकडे आणि हिरव्या पोतीचे मणी-आणखीन किती तरी गोष्टी सापडतील! हे तर आमच्या काव्याचं सारं भांडवल आहे. कवीचे खिसे म्हणजे सुंदर स्त्रियांच्या हरवलेल्या जिनसा सापडण्याचे हमखास ठिकाण असे समजावे. (10 marks)
Q1d. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: आम्ही वस्तीतून बाहेर आल्यावर काशीनाथ मला म्हणाला, “मास्तर, चला पोलीस स्टेशनवर”
“नको.”
“तुम्ही या मूर्खांचा मार सहन केला तरी कसा?”
“त्यांचा मार मी कुठे खाल्ला? मनूने मला मारलं! चल काशीनाथ….” (10 marks)
Q1e. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: पळून जावं वाटायचं. पण कसं जाऊ. आलतो तितून नको नको म्हणाले तेयनी तरी व इतं हेयच्या पेचात सापडलो होतो. कसा कुण्या तोंडानं पळून जाऊ वाटू लागल. असं करु तर कसं व्हईल तसं करु तसं कसं व्हईल. ईकडे आड तिकडे हीर. आगीतून उटून फोफाट्यात पडल्यावानी वाटू लागलं. पण वाटायचं की बाबा. जातील हे बी दिवस. (10 marks)
Q2a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि भौगोलिक परिस्थितीचे चित्र स्मृतिस्थळातून कसे साकार झाले आहे ते सविस्तर वर्णन करा. (15 marks)
Q2b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकातून अभिव्यक्त होणारी, मानवी जीवनासंबंधी महात्मा फुले यांची भूमिका स्पष्ट करा. (15 marks)
Q2c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: नैतिक दृष्ट्या स्खलनशील स्त्री-पुरुष संबंधांचा विचार ‘ब्राह्मणकन्या’ कादंबरीत केतकरांनी कसा केला आहे, चर्चा करा. (20 marks)
Q3a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकात छांदिष्ट माणसांचे एक संपूर्ण विश्वच साकारले आहे. असे तुम्हाला वाटते का? साधक-बाधक चर्चा करा. (15 marks)
Q3b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘जन हे वोळतू जेथे’ या कादंबरीतील नायकाच्या संघर्षाचे स्वरूप स्पष्ट करा. (15 marks)
Q3c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “‘शिळान’ संग्रहातून उद्धव शेळके यांच्या व्यापक अनुभवविश्वाचे प्रत्ययकारी दर्शन घडते” या विधानाचा परामर्श घ्या. (20 marks)
Q4a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “बाबूराव बागूल हे दलित जीवनाचे सर्वश्रेष्ठ कथाकार आहेत.” ‘जेव्हा मी जात चोरली होती’च्या आधारे स्पष्ट करा. (15 marks)
Q4b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘एकेक पान गळावया’ या कादंबरीचा आकृतिबंध उलगडून दाखवा. (15 marks)
Q4c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “मराठवाड्यातील दलित जीवनातील दैन्य, दास्य आणि असह्य दुःख ‘आठवणीचे पक्षी’ मधून पाझरते” या विधानाची विस्तृत चर्चा करा. (20 marks)
Q5a. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: सुई आणि सातुळी कात्री गज दोरा। मांडिला पसारा सदाशिवी नामा म्हणें शिवीं विठोबाचे अंगी। त्याचेनि मी जगी धन्य झालो॥ (10 marks)
Q5b. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: सुंदरा मनामधिं भरली जरा नाहि ठरली हवेलिंत शिरली मोत्याचा भांग
रे गड्या हौस नाहिं पुरलि म्हणोनी विरलि पुन्हा नाहिं फिरलि कुणाची सांग॥ (10 marks)
Q5c. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: त्यातील एक कलहंस तटी निजेला
जो भागला जलविहार विशेष केला
पोटीच एक पद, लांबविला दुजा जो
पक्षी तनू लपवि, भूप तया पाहतो. (10 marks)
Q5d. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: परी भव्य तें तेज पाहून पूजून
घेऊं गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे. (10 marks)
Q5e. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा: अनेक असले खेळ करुं प्रेमाशा विश्वांत भरुं,
सोडुनिया अपुले श्वास खेळवु नाचवु उल्हास
प्रभातकाळी नामनिराळी
होउनिया आपण राहू लोकांच्या मौजा पाहूं (10 marks)
Q6a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “नामदेवाच्या अंतरंगाचे अत्यंत स्वच्छ व नितळ प्रतिबिंब त्यांच्या अभंगवाणीत पाहावयास मिळते.” या विधानाची सत्यता पटवून द्या. (15 marks)
Q6b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: शाहिरी वाङ्मयाला ‘मराठी काव्याची प्रभात’ असे का म्हटले जाते ते स्पष्ट करा. (15 marks)
Q6c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: रघुनाथ पंडितांच्या ‘दमयंती स्वयंवर’ या आख्यान काव्याची कलात्मक वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. (20 marks)
Q7a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: बालकवींच्या कवितांमधून दिसून येणाऱ्या निसर्गाच्या विविध भावछटा उलगडून दाखवा. (15 marks)
Q7b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: “कुसुमाग्रजांच्या कवितेतून अपार जीवननिष्ठा सतत प्रवाहित होत असते.” ‘विशाखा’ काव्यसंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. (15 marks)
Q7c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘मृद्गंध’ या संग्रहातून करंदीकरांची सामाजिक जाणीव आणि इहवादी दृष्टिकोन ठाशीवपणे व्यक्त होतो. साधार पटवून द्या. (20 marks)
Q8a. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘जाहीरनामा’ या काव्यसंग्रहातून नारायण सुर्वे यांचा मानवतावादी दृष्टिकोन कसा अभिव्यक्त होतो? चर्चा करा. (15 marks)
Q8b. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: कवी ग्रेस यांच्या काव्याची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. (15 marks)
Q8c. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: ‘या सत्तेत जीव रमत नाही’ मधील कविता नामदेव ढसाळांच्या काव्याला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या कविता आहेत. साधार पटवून द्या. (20 marks)
Spotted something wrong?
If a question is in the wrong unit or a match looks wrong, please report an error.
Related: Overall Marathi Literature PYQ analysis · Year-wise question papers · Topic-wise PYQs

